पीएसआय स्वरूपा नाईकवाडे यांना महाराष्ट्र शासनाचा विशेष सेवा पुरस्कार जाहीर….! केज – पोलिस उपनिरिक्षक स्वरूपा नाईकवाडे यांना नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा विशेष सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळ केज येथील रहिवासी स्वरूपा सुंदर संगीता नाईकवाडे यांनी जुन २०२२ मध्ये पीएसआय ची ट्रेनिंग पुर्ण केल्यानंतर प्रथम नेमणूक त्यांना गडचिरोली येथे देण्यात आली. तर एक महिना गडचिरोली येथे परत नक्षल विरोधी मोहिमेत काम करण्यासाठी त्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आली.एक महिन्यानंतर त्यांना धानोरा येथील पोलिस ठाणे येथे नेमणुक देण्यात आल्यानंतर २०२२ ते २५ ह्या तीन वर्षात स्वरूपा नाईकवाडे यांनी अनेक मोहीमेत भाग घेतला. दुर्गम भागात त्यांनी चांगले काम केले. तेथील…
Author: विजयराज आरकडे
राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून बीडच्या खा. रजनीताई पाटील इंडिया आघाडीच्या आंदोलनात आक्रमक केज – राज्यसभेच्या खासदार संसदरत्न, कायम सामाजिक व सर्वसामान्य नागरिकांचे विविध विषय अभ्यासपूर्ण आणि आक्रमकपणे संसदेत मांडणाऱ्या काँग्रेसच्या खा. रजनीताई पाटील यांनी काल इंडिया आघाडीच्या आंदोलनात आक्रमक भूमिका घेतली. निवडणूक आयोगाने घेतलेली एकतर्फी भूमिका ही लोकशाहीला घातक असून काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अतिशय महत्वाच्या मुद्याला हात घातला असून यासाठी विरोधी बाकावरील सर्व खासदार या आंदोलनात सामील झाले होते. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून बीड च्या खासदार रजनीताई पाटील या आंदोलनात होत्या अक्षरशः सरकारने पोलिसांच्या दडपशाही ने हे आंदोलन दाबण्याचा…
लोकनेते, स्व.बाबूरावजी आडसकर साहेब यांची पुण्यतिथी सामाजिक व सांप्रदायिक उपक्रमाने साजरी; जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांची उपस्थिती आडस- लोकनेते, माजी आमदार, स्व. बाबूरावजी आडसकर (तात्या) यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.महंत भगवान महाराज वरपगाव संस्थान, यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन तसेच, सर्व रोग निदान आरोग्य शिबीर व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि. १२ रोजी आडस येथे करण्यात आले. यामध्ये हजारो नागरिकांनी सहभागी होत आरोग्य तपासणी केली. यावेळी मोफत औषधोपचार करण्यात आले. शेकडो युवक, नागरीक, महीला यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच ह.भ.प.वरपगावकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा व स्नेह भोजनाचा आस्वाद पंचक्रोशीतील उपस्थित महीला-पुरूष व सर्व नागरिकांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते, कार्यकर्ते,…
महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या कणखर नेतृत्वाने आणि सामान्य माणसाच्या हितासाठी अथक कार्याने ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते माजी आमदार लोकनेते, स्व.बाबूरावजी आडसकर; वृत्तांकन– श्री. प्र.शि.देशमुख सर —————————— महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या कणखर नेतृत्वाने आणि सामान्य माणसाच्या हितासाठी अथक कार्याने ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते माजी आमदार लोकनेते बाबूरावजी आडसकर साहेब यांची ९वी पुण्यतिथी आज आपण स्मरतो. बीड जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी सलग तीन दशकांहून अधिक काळ आपली हुकमत गाजवली. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या या नेत्याने सहकार, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रांत अमूल्य योगदान दिले. त्यांचे रांगडे व्यक्तिमत्त्व, ग्रामीण बोलीभाषा आणि जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे ते लोकनेते म्हणून ओळखले गेले. त्यांच्या…
केजडी नदीच्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून वाहू लागले पाणी; गौतम बचुटे/केज :- केज येथे झालेल्या दमदार पावसाने केजडी नदीवर असलेला कोल्हापुरी बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. दि. ११ ऑगस्ट रोजी केज दुपारी ३:०० वा. च्या सुमारास जोरदार पाऊस पडला. त्या पावसाने केज येथील केजडी नदीला पाणी आले असून केजडी नदीवर असलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. नदीला पाणी आल्याने मासे पकडणारे हौशी लोक मासे पकडण्यासाठी गर्दी करू लागले आहे. तर या वर्षीच्या हंगामात प्रथमच नदीला पाणी आल्याने बघ्यांची गर्दी होत आहे.
अंगणवाडी सेविकेची मुलगी झाली पोलीस : आई वडिलांचे स्वप्न झाले साकार ! हातातला कोयता खाली टाकून आता हाती आली लाठी ! गौतम बचुटे/केज :- आई अंगणवाडीत खाऊ शिजविण्याचे काम करीत असून वडील एक ऊसतोड कामगार असताना काजल शिनगारे हिने आपल्या प्रयत्न आणि बुद्धीच्या जोरावर मुंबई पोलिसात भरती होऊन आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. केज तालुक्यातील कोरेगाव येथील काजल शिनगारे ही एका सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नाही. तिची आई उर्मिला पायाळ-शिनगारे ही अंगणवाडीतील मुलांना खाऊ शिजवून वाटपाचे काम करीत आहे. तर वडील हे ऊसतोड आणि रोजी रोजंदारी करीत आहेत. काजल हिनेही आई वडिलांना मदत करण्यासाठी…
लोकनेते माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त आडस येथे होणार सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीर – रमेशराव आडसकर केज (प्रतिनिधी) सत्तरच्या दशकातील केज, अंबाजोगाई तालुक्यातील सहकार, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून विकासाची गंगा खेचुन आणणारे लोकनेते माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांच्या कामाच्या माध्यमातून अजुनही शेतकरी, शेतमजूर यांच्या मनात कायम स्मृती आहेत.त्यांचा हाबाडा हा शब्द संपुर्ण महाराष्ट्रात गाजला होता. लोकनेते माजी आमदार स्व. बाबुरावजी आडसकर यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्त दि.12/8/2025 मंगळवारी छत्रपती शिवाजी विद्यालय आडस या ठिकाणी सकाळी नऊ वाजता सर्व रोग निदान व रक्तदान शिबीर होणार असुन सकाळी अकरा वाजता ह.भ.प.भगवान महाराज वरपगांवकर यांचे पुण्यतिथी निमित्त किर्तन होणार…
विस्तार अधिकारी विजयकुमार मस्के आणि कनिष्ठ सहाय्यक उषा चाटे-गित्ते यांचा सत्कार गौतम बचुटे/केज :- केज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विजयकुमार मस्के आणि कनिष्ठ सहाय्यक उषा चाटे-गित्ते यांचा सत्कार करण्यात आला. या बाबतची माहिती अशी की, गेवराई पंचायत समिती येथून पदोन्नती झालेले विजयकुमार मस्के हे केज पंचायत समितीच्या पंचायत विभागाच्या विस्तार अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. तर चिंचोली माळी येथे पूर्वी परिचर म्हणून सेवारत असलेल्या उषा चाटे-गित्ते यांना कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती झालेली असल्याने. त्या सुद्धा केज पंचायत समितीला कनिष्ठ सहाय्यक पदावर रुजू झालेल्या आहेत. त्या बद्दल पंचायत समिती, ग्रामपंचायत अधिकारी, मित्र आणि गावकऱ्यांच्या वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक…
केज बस स्टँडवरून रुद्राक्ष देऊन ११ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लांबविली ! गौतम बचुटे/:- केज येथील बस स्टँड वरून बसची चौकशी करणाऱ्यांसाठी गेलेल्या ६५ वर्षाच्या वृद्ध प्रवाशाला गोड बोलून त्याला रुद्राक्ष देऊन त्याच्या हातातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. आवळा देवून कोहळा काढणे अशी मराठीत म्हण आहे. तसाच एक प्रकार केज येथील बस स्टँडवर घडला आहे. दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वा. च्या सुमारास लातूर जिल्ह्यातील रामेश्वर येथील सेवानिवृत्त कर्मचारी शिवाजी पंढरीनाथ बळवंत हे त्यांच्या टाकळी ता. केज येथील मुलगी निर्गुणा माने हिच्या सोबत धारूरला जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर आले होते. केज…
महसूल अभियानात केज तालुका अव्वल; उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे आणि राकेश गिड्डे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा विश्वास ! गौतम बचुटे/केज :- केज तहसीलच्या वतीने शासनाचे विविध उपक्रम राबवित असताना तालुक्यातील नागरिक आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तहसीलदार राकेश गिड्डे हे काम करीत असल्याने सामान्य नागरिक त्यांच्या कार्यपद्तीवर खुश आहेत. केज तहसीलदार राकेश गिड्डे आणि त्यांची सर्व टीम ही केज तालुक्यात अत्यंत चोखपणे काम करीत आहे. राकेश गिड्डे यांनी तालुक्यातील मतदार नोंदणी, तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडल्या आहेत. तसेच त्यांना मार्गदर्शन करीत असलेले अंबाजोगाई विभागाचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. केज तहसीलच्या वतीने तालुक्यातील बनसारोळा, विडा, सोनेसांगवी…