लोकनेते, स्व.बाबूरावजी आडसकर साहेब यांची पुण्यतिथी सामाजिक व सांप्रदायिक उपक्रमाने साजरी;
जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांची उपस्थिती
आडस-
लोकनेते, माजी आमदार, स्व. बाबूरावजी आडसकर (तात्या) यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.महंत भगवान महाराज वरपगाव संस्थान, यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन तसेच, सर्व रोग निदान आरोग्य शिबीर व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि. १२ रोजी आडस येथे करण्यात आले. यामध्ये हजारो नागरिकांनी सहभागी होत आरोग्य तपासणी केली.
यावेळी मोफत औषधोपचार करण्यात आले. शेकडो युवक, नागरीक, महीला यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
तसेच ह.भ.प.वरपगावकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा व स्नेह भोजनाचा आस्वाद पंचक्रोशीतील उपस्थित महीला-पुरूष व सर्व नागरिकांनी घेतला.
यावेळी जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरीक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
लोकनेते स्व. बाबूरावजी आडसकर यांची सामाजिक व सांप्रदायिक उपक्रमाने पुण्यतिथी साजरी केली गेली त्यामुळे उपस्थित नागरिक, नेते यांनी आडसकर कुटुंबाचे कौतुक केले आहे.
याप्रसंगी मृदांगाचार्य उद्धव बापू आपेगावकर, रामभाऊ कुलकर्णी प्रदेश प्रवक्ता भाजपा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्व. बाबूरावजी आडसकर साहेब यांनी राजकारणा बरोबरच सांप्रदायिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याचे स्वरूप मांडले. मा. रमेशराव आडसकर, ॠषी भैय्या आडसकर,अर्चना ताई आडसकर,रंजित दादा आडसकर व संपूर्ण आडसकर कुटुंब हे तात्यांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत, त्याचेही कौतुक केले आहे.
सहकार, शैक्षणिक क्षेत्रात स्व. बाबूरावजी आडसकर (तात्या) यांनी सामान्य नागरिकांशी नाळ कायम जोडण्यासाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र काम केले, तोच वसा घेऊन आडसकर कुटुंब बीड जिल्ह्यात काम करेल असा विश्वास मा. रमेशराव आडसकर यांनी व्यक्त केला.
लोकनेते, स्व. बाबूरावजी आडसकर (तात्या) यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्ताने
रामभाऊ कुलकर्णी
(प्रदेश प्रवक्ता भाजपा)
श्री. उद्धव बापू आपेगावकर,
दत्ता अबा पाटील, व्हा. चे. अंबासाखर,
अंकुशराव इंगळे सभापती कृ. उ. बा.स, माजी जि. प. सदस्य सुरेश तात्या पाटील, मनोहरराव डाके आबा ,
राजेश्वर आबा चव्हाण जि. अ. रा. कॉ. पा. बीड,
राजाभाऊ औताडे
दिलीपराव गुळभिले,
नेटके साहेब,
बबन भैय्या लोमटे, उदयसिंह दिख्खत,
किर्दक साहेब, राज किशोर
पापा मोदी, गटनेते हारून भाई इनामदार,
सौ. सिताताई बनसोड नगराध्यक्ष केज,
ईश्वर मुंडे,माजी जि. प. सदस्य किसन दादा कदम, बंडूसेठ भनसाळी,
उत्तमराव थोरात,
शिवाजीराव देशमुख,
गफार साहेब,
अमर भैय्या पाटील,
सुशील भैय्या अंधारे,
अझहर भैय्या इनामदार,
हनुमंत काका मोरे,
अनंतदादा लोमटे,
कमलाकर कोपले,
मोरे साहेब सरपंच मोरेवाडी,
विनायक मुळे शिवसेना वडवणी,
सर्व रोग निदान व रक्तदान शिबीरा निमित्त स्वा. रा. ती. अंबाजोगाई येथील
डॉ. रूचा पाटील, डॉ. सचिन काटाळे, डॉ. निशांत, डॉ मोहम्मद तारीक, डॉ. सचिन ढवारे, डॉ. अनिकेत मुसळे, डॉ. साहील मुंडे, डॉ. मंदार दाभाडे, डॉ. प्रियंका घुले, डॉ. अतुल डोईफोडे, डॉ. नेहा सोनवणे, डॉ. कार्तिक कोलापरथी, डॉ. अजिंक्य राठोड, डॉ. अनंत पवार हे वैद्यकीय पथक उपस्थित होते.
सुत्रसंचालन सुरेश गिरी सर यांनी केले.