केजडी नदीच्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून वाहू लागले पाणी;
गौतम बचुटे/केज :-
केज येथे झालेल्या दमदार पावसाने केजडी नदीवर असलेला कोल्हापुरी बंधारा ओसंडून वाहू लागला आहे.
दि. ११ ऑगस्ट रोजी केज दुपारी ३:०० वा. च्या सुमारास जोरदार पाऊस पडला. त्या पावसाने केज येथील केजडी नदीला पाणी आले असून केजडी नदीवर असलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. नदीला पाणी आल्याने मासे पकडणारे हौशी लोक मासे पकडण्यासाठी गर्दी करू लागले आहे. तर या वर्षीच्या हंगामात प्रथमच नदीला पाणी आल्याने बघ्यांची गर्दी होत आहे.
