गोविंदेश्वर प्राथमिक शाळेत लेखन प्रेरणा दिन साजरा; नांदेड : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गोविंदेश्वर प्राथमिक शाळा, खंडोबा चौक, तरोडा बु., नांदेड येथे लेखन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर होते. यांच्या हस्ते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या साहित्यिक, सामाजिक व परिवर्तनवादी कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी व सर्जनशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने निबंध लेखन, सुविचार लेखन व हस्ताक्षर लेखन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर…
Author: विजयराज आरकडे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : जीवन आणि कार्य सविस्तर माहिती केज- प्रतिनिधी अण्णाभाऊ साठे (पूर्ण नाव: तुकाराम भाऊराव साठे) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकशाहीर, लेखक, कादंबरीकार आणि समाजसुधारक होते. अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती: जन्म: १ ऑगस्ट १९२०, वटेगाव, सांगली जिल्हा, महाराष्ट्र. मृत्यू: १८ जुलै १९६९. ते मातंग समाजात जन्मले. अत्यंत गरीब परिस्थितीतही त्यांनी आपल्या लेखनाने मोठे नाव कमावले. त्यांनी कामगार, शेतकरी, दलित आणि वंचित समाजाच्या जीवनावर प्रभावी साहित्य लिहिले. त्यांना “लोकशाहीर” म्हणून ओळखले जाते. त्यांनी ३० हून अधिक कादंबऱ्या, अनेक कथा, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्ये लिहिली. त्यांची “फकीरा” ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध असून तिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या साहित्यामध्ये सामाजिक न्याय,…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : जीवन आणि कार्य सविस्तर माहिती अण्णाभाऊ साठे (पूर्ण नाव: तुकाराम भाऊराव साठे) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकशाहीर, लेखक, कादंबरीकार आणि समाजसुधारक होते. अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी माहिती: जन्म: १ ऑगस्ट १९२०, वटेगाव, सांगली जिल्हा, महाराष्ट्र. मृत्यू: १८ जुलै १९६९. ते मातंग समाजात जन्मले. अत्यंत गरीब परिस्थितीतही त्यांनी आपल्या लेखनाने मोठे नाव कमावले. त्यांनी कामगार, शेतकरी, दलित आणि वंचित समाजाच्या जीवनावर प्रभावी साहित्य लिहिले. त्यांना “लोकशाहीर” म्हणून ओळखले जाते. त्यांनी ३० हून अधिक कादंबऱ्या, अनेक कथा, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्ये लिहिली. त्यांची “फकीरा” ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध असून तिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या साहित्यामध्ये सामाजिक न्याय, समता, स्वाभिमान…
अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल ! केज दि १५प्रतिनिधी- तालुक्यातील जवळबन येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक जणांचा मृत्यू यापूर्वी झालेला आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले या सततच्या पुरूषांच्या व्यसनाधीनतेला वैतागून गावातील सबंध महिलांनी एकत्र येऊन बुधवार रोजी सकाळी आठ वाजता आक्रोश रॅली गावात काढली. महिलांच्या पुढाकारानंतर पुरुष मंडळी यामध्ये सहभागी झाले. गावात दारू विक्री करणाऱ्यांच्या घरावर थेट मोर्चा धडकला. यावेळी महिला आक्रमक होऊन घोषणाबाजी करत होत्या पूर्ण गावातून जनजागृती रॅली काढून जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आक्रोश मोर्चाचा समारोप…
केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी केज दि ९(प्रतिनिधी) केज उपजिल्हा रुग्णालयाची प्रशस्त मोठी इमारत बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण झाल्यापासून काही कालावधीतच शौचालयांचे आउटलेट अर्धवट ब्लॉक झाल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णालयातील मुख्य इमारतीतील पुरुष आणि महिला शौचालयांमधून सांडपाणी परत येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. रुग्णालयात ऍडमिट होऊन औषध उपचार घेणाऱ्या रुग्णांना शौचालये वापरण्यास अयोग्य झाल्याने रुग्णांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे —–चौकट— सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने आउटलेट ब्लॉक…
सर्वात कमी वयात भारतीय संघात पदार्पण; वैभव सूर्यवंशीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष; नवी दिल्ली / इंग्लंड प्रतिनिधी : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचत अवघ्या 15 व्या वर्षी भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघात पदार्पण केले आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली असून, सर्वात कमी वयात भारताचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू म्हणून त्याने महान फलंदाज Sachin Tendulkar यांचा 36 वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला आहे. वैभव सूर्यवंशीने यापूर्वी आयपीएल आणि अंडर-19 क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी करत क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात निवड झाली असून, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तो कशी छाप पाडतो…
मयत न.प.कर्मचारी भिमराव मस्के यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची सर्व स्तरातून होत आहे मागणी; केज :- केज येथील नगरपंचायतीच्या घरकुल घोटाळ्यात संशयित आरोपी व निलंबित केलेले नगरपंचायतीचे वॉलमन भीमराव मस्के यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करावा, या मागण्यासाठी नातेवाईकांनी गुरुवारी रात्री त्यांचा मृतदेह तहसील कार्यालयात आणला. त्यानंतर मध्यरात्री रास्ता रोको आंदोलन ही केले. पहाटे उपविभागीय अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन ३३ तासाने अंत्यसंस्कार करण्यात आले. केज नगरपंचायतीच्या प्रधानमंत्री घरकुल घोटाळा प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये संशयित आरोपी असलेले नगरपंचायतीचे वॉलमन भीमराव शामराव मस्के यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर…
मृत विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यात म्रतदेह घेऊन आंदोलकाचा ठिय्या; रस्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प केज, दि. २३ : टाकळी येथील रहिवासी मृत विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी मृतदेहासह दि. २३ रोजी थेट केज पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. माहितीनुसार, दि. २० जून रोजी रात्री विलास घुले हे गावातील भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दि. २१ जून रोजी स्व. रा. ती. ग्रामीण रुग्णालय,…
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकाचा चाकू भोसकून खून; केज: येथील कदमवाडी फाट्यावर अनैतिक संबंधाच्या संशयावरून सुरू असलेले भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका हॉटेल चालकाचा चाकू भोकसून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विलास घुले असे मृत हॉटेल चालकाचे नाव असून, गंभीर जखमी झाल्यानंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना २१ जून रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे केज परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा रस्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. कदमवाडी फाट्यावरील…
केजच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कुशल नेतृत्व– अंकुशराव (अण्णा) इंगळे वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव; केज : केजसह संपूर्ण तालुक्यात परिचित असलेले राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व म्हणून अंकुश अण्णा इंगळे यांची ओळख आहे. आडसकर कुटुंबाशी त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याने स्व. माजी आमदार बाबूरावजी आडसकर साहेब यांच्यापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास स्व. मेघराज आडसकर आणि सध्या मा. रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजही अविरत सुरू आहे. केज तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक प्रश्नांची सखोल जाण ठेवून ते जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने अग्रेसर राहिले आहेत. केज ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती केजचे उपसभापती अशी विविध महत्त्वाची…