Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

शस्त्राचा धाक दाखवून दुचाकी चोरणाऱ्या ‘डॉन’ला नागरिकांनी पकडले; केज पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 4, 2026No Comments2 Mins Read

शस्त्राचा धाक दाखवून दुचाकी चोरणाऱ्या ‘डॉन’ला नागरिकांनी पकडले; केज पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल

केज: दुकानासमोर लावलेली दुचाकी चोरून नेताना पकडल्यावर धारदार शस्त्राचा धाक दाखवून स्वतःला डॉन म्हणवत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका सराईताला नागरिकांच्या मदतीने रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्यावर जबरी चोरी आणि शस्त्राचा धाक दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बाळासाहेब निवृत्ती ठोंबरे (वय ३५ वर्षे, व्यवसाय शेती, रा. एकुरका, ता. केज, जि. बीड, सध्या रा. मधुबन हॉटेलच्या मागे, केज) हे गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कीर्ती जनरल स्टोअर समोर आपली मोटारसायकल (क्रमांक एमएच ४४ वाय ७३६९) उभी करून खरेदीसाठी गेले होते. दुकानातून सामान घेऊन बाहेर पडताच त्यांची दुचाकी एक व्यक्ती चोरून घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. फिर्यादीने तत्काळ पाठलाग करून त्याला अडवले असता, त्याने जवळ असलेले धारदार शस्त्र उपसले. ‘तू मला ओळखत नाहीस का, मी केजचा खूप मोठा डॉन आहे, माझे नाव जुबेर उर्फ मारी आहे’ अशी धमकी देत त्याने अश्लील शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याचा इशारा दिला.

फिर्यादीच्या आरडाओरड्याने परिसरातील नागरिक धावून आले आणि त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी जुबेर उर्फ मारी मुस्ताक फारुकी (रा. रोजा मोहल्ला, केज, जि. बीड) याला दुचाकीसह जागीच पकडले. त्यानंतर नागरिकांनी त्याला मुद्देमालासह पोलीस ठाण्यात आणले. फिर्यादीच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील जबरी चोरी, धमकीच्या कलमान्वये तसेच भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण दत्तात्रय उंबरे हे करीत आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 18
विजयराज आरकडे

Related Posts

हारूनभाई इनामदार व सिताताई बनसोड यांची दर्जेदार कामासाठी संबंधितांना सूचना; कानडी रोडवरील नाल्याच्या कामाला गती;

September 2, 2026

कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थाचे प्रगत स्वरूप —- प्रोफेसर मनसाफ आलम

September 1, 2026

अनवाणी धावत रमाबाईंनी जिंकली ‘अमृत दौड’; ४७ वर्षीय महिलेच्या जिद्दीला टाळ्यांचा कडकडाट;

September 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 0 9 8
Total Users : 149098
Views Today : 24

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.