बायकोचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेचा खून ! आरोपी नवरा पोलिसांच्या ताब्यात गौतम बचुटे/केज (बीड) :- केज तालुक्यातील शेतात एका महिलेचा चारित्र्याच्या संशया वरून खून झाला असून हा खून तिच्या नवऱ्यानेच केला आहे. खून करून तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील नागझरी येथील सुवर्णा आणि विलास आघाव हे पती-पत्नी हे सारणी (आनंदगाव) येथे सालगडी म्हणून एका शेतात काम करीत होते. दि. ३१ ऑगस्ट रोजी आंनदगाव (सारणी) ता. केज येथील शेतात आज दुपारी विलास नामदेव आघाव रा. नागझरी ता. धारूर या सालगड्याने त्याची पत्नीचे एका पुरूषा सोबत अनैतिक संबंध असल्याच्या चारित्र्याच्या…
Author: विजयराज आरकडे
अंगणात मूग बडीवीत असलेल्या महिलेच्या अंगावर विज पडून मृत्यू गौतम बचुटे/केज (बीड) :- केज तालुक्यातील कोरेगाव येथे सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान अंगावर विज पडून तापशीला बाळासाहेब दराडे वय ४० वर्ष या महिलेचा मृत्यू झाला आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील कोरेगाव येथे घरा समोर अंगणात मुग बडवीत असलेल्या महिला तापशिला बाळासाहेब दराडे वय (४० वर्षे) हिच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात पती, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.
कर्तव्यदक्ष व तडफदार अधिकारी म्हणून ओळखले जाणारे राकेश गिड्डे केजचे नवीन तहसीलदार म्हणून नियुक्त केज : येथील तहसीलदारांचे पद रिक्त होते. यामुळे येथे तहसीलदार म्हणून कोण येणार? याकडे लक्ष लागले होते. आज महाराष्ट्र शासनाने तहसीलदार यांच्या बदलीचे आदेश काढले असून यात राकेश आण्णासाहेब गिड्डे यांची केज तहसीलदारपदी नियुक्ती केली असून ते येत्या काही दिवसांत पदभार घेतील . तडफदार अधिकारी अशी त्यांची कारकिर्द आहे. तहसीलदार आले आता गटविकास अधिकारी कधी येणार याची केज तालुक्याला प्रतीक्षा आहे. जवळपास तीन महिन्यांपूर्वी एसीबीने कारवाई करत कोतवालास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. या घटनेनंतर तहसीलदार गायब असल्याने येथील पद रिक्त होते. ते प्रभारी अधिकारी कामकाज…
*आरोग्य विभागातील भर्ती संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन* गौतम बचुटे/केज (बीड) :- बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सेविका पदासाठी जी एन एम आणि बी एस्सी नर्सिंग यांची निवड करून त्यांनाही संधी देण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा अंतर्गत सरळ सेवेने आरोग्यसेविका पदाच्या भरती संदर्भात झालेल्या लेखी परीक्षे नंतर त्यांची गुणवत्ता यादी आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झाल्या नंतर दि. २८ ऑगस्ट पासून त्यांच्या कागद पत्रांची पडताळणी ही जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय अंतर्गत सुरू आहे मात्र ज्या विद्यार्थिनींनी जी एन एम आणि बी एस सी…
जी आमदार संगिता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला संगीता ठोंबरे यांच्यासह चालक जखमी केज – केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या गाडीवर एका व्यक्तीने दगड मारून हल्ला केला आहे. यात गाडीचा काच फुटून समोर बसलेल्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या चेहर्याला मार लागला आहे तसेच वाहन चालकही जखमी झाला आहे. ही घटना तालुक्यातील दहीफळ येथे घडली असून संगीताताई ठोंबरे या उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाल्या आहेत. नेमका हा प्रकार कशा मुळे घडला व त्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही.
वसंत प्राथमिक शाळेत बाल गोपाळांनी केला दहीहंडी उत्सव आनंदाने साजरा केज- येथील वसंत प्राथमिक शाळा केज येथील बालगोपाळांनी गोपालकाला निमित्ताने दहीहंडी उत्सव उत्साहाने साजरा करून आनंद घेतला. शहरातील मराठी-सेमी माध्यमातील एक नामांकित शिक्षण देणारी शाळा म्हणून वसंत प्राथमिक शाळेची ओळख आहे. गोपालकाला निमित्ताने आयोजित दहीहंडी उत्सव कार्यक्रमात शाळेतील बालगोपाळांनी राधा कृष्ण वेशभूषा परिधान करून व विविध नृत्य सादरीकरण करून आनंद साजरा केला. यानंतर सर्व विद्यार्थी यांच्या एकजुटीने दहीहंडी फोडून उत्सव उत्साहाने साजरा केला गेला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख, किरण अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर, यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून हा उत्सव उत्साहाने साजरा करण्यासाठी प्रेरणा दिली.…
डॉ अंजलीताई घाडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश येणार्या काळात केज मतदारसंघात योग्य संधी देऊन न्याय देण्याचे मा. जयंत पाटील यांनी केले मोठे विधान केज- केज मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्त्या डॉ अंजलीताई घाडगे यांनी रा. कॉ. शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत एका आयोजित मेळाव्यात पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी मा. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून अंजलीताई घाडगे यांची माहिती उपस्थित नेते, कार्यकर्ते यांना देताना सांगितले की, डॉ अंजलीताई घाडगे या उच्च शिक्षित असून त्यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रात चांगले कार्य आहे. शिव स्वराज्य यात्रा केज मतदारसंघात पोहचल्यानंतर त्यांनी व त्यांच्या संबधित कार्यकर्ते यांनी खूप छान पध्दतीने…
स्थानिक गुन्हे शाखेची केज तालुक्यात मोठी कारवाई तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी तर एक आरोपी अल्पवयीन गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यात वरपगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून हरिणाची शिकार करून त्याच्या माणसांची वाटणी करीत असताना चौघांना रंगेहाथ ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे. चौघा शिकाऱ्या पैकी एकजण अल्पवयीन असून तिघांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की, दि. २४ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरक्षक मुरकुटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगताप, पोलीस जमादार गायकवाड, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस हवालदार राठोड, पोलीस नाईक राजू पठाण, यादव, उगले आणि वडमारे हे केज उपविभागात गस्त…
बंसल क्लासेस कळंब शाखेत महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन *स्त्री सशक्तीकरणासाठी जनजागृती शिबिर अतिशय महत्वाचे : आरती जाधव* प्रतिनिधी (कळंब): दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी बंसल क्लासेस कळंब शाखेच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी सुरक्षा व संरक्षण या विषयवार कळंब शाखेत शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून पोलीस उप-निरीक्षक तथा पिंक पथकाच्या प्रमुख (उपविभाग कळंब) मा.आरती जाधव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास अध्यक्षा म्हणून केज शहराच्या नगराध्यक्षा मा.सीताताई बनसोड मॅडम या देखील उपस्थित राहिल्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.डॉ. संजीवनी जाधव मॅडम (बी. डी.एस.) आणि मोडेल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका मा.प्रा.लता यंदे मॅडम…
शिक्षकांनी विध्यार्थ्यांच्या मदतीने सीडबॉलच्या माध्यमातून केली वृक्ष लागवड जि.प.प्रा.शा.नागझरी शाळेचे वृक्ष संवर्धनासाठी अनोखा उपक्रम ; सर्वत्र होत आहे कौतुक जिल्हा बीड: केज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागझरी येथील शिक्षक अनंत नानाभाऊ जाधवर यांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्वाचा उपक्रम राबवला आहे. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने 1000 सीड बॉल (बीज गोळे) बनवून गावात विविध ठिकाणी फेकले आहेत. सीड बॉल म्हणजे एका गोळ्यातबॉल्समध्ये माती, बीजे आणि कंपोस्ट यांचे मिश्रण केले जाते, . हे गोळे जमिनीवर फेकून दिले जातात, आणि ते नंतर निसर्गाच्या मदतीने रुजतात. सीड बॉल्सचा उपयोग वनस्पतींचा प्रसार साधण्यासाठी, विशेषत: जंगलाच्या निर्मिती आणि निसर्ग संरक्षणासाठी केला जातो. यामुळे पर्यावरणीय सुधारणा होण्यास…