निश्चयाचे बळ मिळते फळ
——————————–
नुकत्याच झालेल्या Mpsc परीक्षेत आमच्या वसंत प्राथमिक शाळा केज व माझा विद्यार्थी कु शैलेश नागनाथ मुंडे समर्थ नगर केज येथील रहिवासी हा धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद मध्ये सीनियर अकाउंटंट म्हणून नोकरी मिळाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे विशेष बाब म्हणजे लहानपणापासून अतिशय चिकाटी व अभ्यास वृत्ती होती लहान वयातच वडिलांचे छत्र हरवले होते घरातील सर्व जबाबदारी आईवर येऊन ठेपलेली होती तरीपण आईने न डगमगता आपल्या मुलांवर चांगले सुसंस्कार व शिक्षणाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली आणि मुलांचे मुलींचे चांगल्या प्रकारे शिक्षण त्यांना दिले गेले या मुलाने आपल्या आईला साथ देत घरातील जबाबदाऱ्या सांभाळात आपला अभ्यास चालू ठेवला व पहिली परीक्षा पास होऊन नोकरी मिळाली परंतु या नोकरीत सुद्धा समाधान न मानता पुढचे शिक्षण चालू ठेवले मला काहीतरी मोठी नोकरी मिळाली पाहिजे या निश्चयाने अभ्यास करत राहिला इतकी मोठी कुटुंबाची जबाबदारी असताना सुद्धा आईनेही त्याला साथ दिली खरंतर त्या आईचे सुद्धा खूप खूप अभिनंदन केले पाहिजे आणि केले सुद्धा अखेरीस त्याला मोठी नोकरी मिळालीच म्हणूनच म्हणतात निश्चयाचे बळ मिळते फळ
किरण अस्वले सर,
सह. शि. वसंत प्राथमिक शाळा, केज
