सुभाष गुरव यांचा प्रामाणिकपणा
सापडलेले ४६ हजार रु केले परत
गौतम बचुटे/केज :- केज येथे रस्त्यावर सापडले ४६ हजार ८०० रू. तीन आठवड्यात नंतर ओळख पटवून ते पोलीस ठाण्यात आणून पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बचत गटाच्या महिलेला परत केल्याची अनोळखी घटना केज घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २६ ऑगस्ट दुपारी ३:३० वा. च्या सुमारास सुभाष रामभाऊ वाघमारे (गुरव), कोठी यांना केज येथील येवले चहा या दुकाना समोरील रस्त्यावर प्लॅस्टिकच्या पिशवी सापडली. ती त्यांनी उघडून पहिली असता त्यात ४६ हजार ८०० रू असल्याचे निदर्शनास आले. परंतु हे पैसे कुणाचे आहेत ? हे त्यांना माहीत नसल्याने ते कुणाला व कसे परत करावे ? हे त्यांना समजत नव्हते. म्हणून त्यांनी ते पैसे जसेच्या तसे घरी नेवून ठेवले.
दि. १७ सप्टेंबर रोजी सुभाष वाघमारे (गुरव) यांनी सामाजिक कार्यकर्ते योगेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांनी केज बिटचे जमादार श्रीकांत चौधरी यांची भेट घेतली आणि त्यांना सापडलेले पैसे हे ज्यांचे असतील त्यांना परत करायचे आहेत. असे सांगितले. योगायोगाने केज येथून पैसे हरवल्याच्या एका प्रकरणाचा तपास पोलीस जमादार श्रीकांत चौधरी यांच्याकडे होता.
त्यामुळे पोलीस जमादार श्रीकांत चौधरी यांनी कोमल शिनगारे यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले आणि ते पैसे त्यांचेच असल्याची खातरजमा केली. त्या नंतर सुभाष वाघमारे (गुरव) यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस जमादार श्रीकांत चौधरी यांच्या हस्ते सौ. कोमल शिनगारे यांच्या सुपूर्त ४६ हजार ८०० रू. केले.
सुभाष वाघमारे (गुरव) यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर तीन आठवड्या नंतर पैसे परत मिळाले. याचा आनंद कोमल शिनगारे यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
——————————–
पैसे हरवल्याची पार्श्वभूमी :-
केज तालुक्यातील कोठी येथील सौ. कोमल कृष्णा शिनगारे या बचत गटाचे सक्रिय सदस्या आहेत. रमाई बचतगट नावाचा त्यांचा शेतमजूर महिलांचा बचतगट आहे. दि. २६ ऑगस्ट रोजी त्यांच्या बचत गटाची महिलांची जमा झालेली ४६ हजार ८०० रू. ची बचत ही आयडीबीआय बँक केजच्या शाखेत बचत गटाच्या खात्यावर जमा करण्यासाठी सौ. कोमल शिनगारे या जात असताना माऊली मेडिकल स्टोअर्स ते येवले चहा दरम्यान त्यांच्या पर्स मधून गहाळ झाले होते. शोधा-शोध करूनही पैसे सापडले नाहीत. यामुळे त्या घाबरून गेल्या होत्या. त्यांची परिस्थिती बेताची असून त्या मोलमजुरी करीत आहेत. त्यामुळे त्या खूप धास्तावल्या होत्या.
नंतर दि. ४ सप्टेंबर रोजी त्यांनी केज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देखील दिली होती.
———————–
