सुरेखा लोंढे -बचुटे यांना
शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर
बालासाहेब बचुटे:
केज तालुक्यातील लव्हुरी केंद्रातील नागझरी शाळेच्या सह शिक्षिका श्रीमती सुरेखा साहेबराव लोंढे -बचुटे यांना शिक्षकांची पतसंस्था (म.)केज च्या शिक्षक रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
लव्हुरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागझरी येथील शिक्षिका सुरेखा लोंढे-बचुटे यांची शिक्षकांची पतसंस्था (म.) केज च्या शिक्षक रत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे.शिक्षकांची पतसंस्था (म.) केज यांच्या विद्यमाने तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. सुरेखा लोंढे-बचुटे यांनी या पूर्वी साळेगाव केंद्रातील सातेफळ आणि माळेगाव येथील शाळेत अध्यापनाचे काम केले आहे.सध्या त्या नागझरी येथील शाळेत कार्यरत आहेत.त्यांची अध्यपनाप्रती निष्ठा आणि विविध उपक्रमात असलेला सहभाग यामुळे त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत.त्यांच्या या कार्याची दखल लव्हुरी केंद्रातील श्री.जगदाळे किरण सर (संचालक) ,केंद्रीय मुख्याध्यापक श्री. चाटे सर ,नागझरी शाळेतील शिक्षक यांच्यासह पत संस्थेचे अध्यक्ष श्री.कल्याण काळे, सचिव संजय गलांडे उपाध्यक्ष अंकुशे सर अधिकृत पंच भालेराव सर यांच्या सह संचालक मंडळाने त्यांची शिक्षक रत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार दिनांक 22 सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे.
