Author: विजयराज आरकडे

केज नगरपंचायत अंतर्गत महा स्वच्छता अभियान २०२४ स्वच्छता पंधरवाडा मोहिमेस प्रारंभ नगरपंचायत आपल्या दारी या अभियाना अंतर्गत नागरिकांचे विविध प्रश्न सोडविणार- हारूणभाई इनामदार केज शहरातील सुजान नागरिकांनी स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे-सौ.सीताताई बनसोड केज/प्रतिनिधी केज नगरपंचायत अंतर्गत महा स्वच्छता अभियान २०२४ स्वच्छता पंधरवाडा मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन केज नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला आहे. नगरपंचायत आपल्या दारी या अभियाना अंतर्गत नागरिकांचे विविध प्रश्न सोडविणार आहोत असे प्रतिपादन हारूणभाई इनामदार यांनी केले आहे तर केज शहरातील सुजान नागरिकांनी स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी केले आहे. केज नगरपंचायत अंतर्गत स्वच्छ संरक्षण…

Read More

केज येथील प्रसिद्ध लिओ जिमचा वर्धापनदिन उत्साहाने साजरा उत्कृष्ट बॉडी बिल्डर्सचा मान्यवरांनी केला विशेष गौरव केज- लिओ जिमचा द्वितीय वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी केज शहराच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम, केज पंचायत समितीचे जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी श्री.सुनील केंद्रे साहेब, केज पोलिस स्टेशन चे PSI श्री.राजेश पाटील साहेब, केज तालुका क्रीडा संयोजक श्री.विनोद गुंड सर, डॉ. अमोल तारळकर सर, श्री सचिनभैय्या नेहरकर तसेच विद्याधन कोचिंग क्लासेस चे संचालक श्री.गिरी सर, श्री.नेहरकर सर आणि सर्व लिओ जिम चे मेंबर्स उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गिरी सर यांनी केले. या प्रसंगी लिओ जिम मधील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आठ मेंबर्सना…

Read More

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे महा अधिवेशन सांगली येथे उत्साहात संपन्न सांगली- प्रतिनिधी मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे सातवे महाअधिवेशन सांगली येथे पार पडले या अधिवेशनाच्या अध्यक्ष सीमाताई बोके होत्या. वैचारिक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय, महिला सक्षमता या अनेक विषयावर नामवंत महिला मान्यवरांचे व्याख्याने झाली. या सोहळ्यातील मौल्यवान वैचारिक विचारांची शिदोरी घेण्यासाठी या अधिवेशनाला बीड जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला पदाधिकारी सदस्या जिजाऊंच्या लेकींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सांगली जिजाऊंच्या अधिवेशनाला आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्षा शिवमती अनुजा राजे भोसले, रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा शिवमती नेहल चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्षा शिवमती रविना गुजर यांची विशेष उपस्थिती होती. बीड जिल्हा येथून प्रदेश…

Read More

केज-बीड रोडवर आढळले अनोळखी पुरुषाचे प्रेत : पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन गौतम बचुटे/केज :- केज येथे केज-बीड रोडवर, पोलीस स्टेशन समोरील रोडवर दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०० वा. चे सुमारास एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत आढळून आले आहे. त्या प्रेताचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. उंची ४ फूट ९ इंच, सावळा रंग, अंगात राखाडी रंगाचे स्वेटर आणि डोक्याला भगवा रुमाल. अशा अवस्थेत आढळून आले आहे. प्रेताची ओळख पटलेली नसून पोलिसांनी सदर प्रेत हे उपजिल्हा रुग्णालय केजच्या शवागृहात ठेवले आहे. मयताच्या बाबतीत जर कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी तात्काळ केज पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्याशी मोबाईल नंबर…

Read More

महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे महा अधिवेशन चिपळूण येथे उत्साहात संपन्न चिपळूण- प्रतिनिधी मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे सातवे महाअधिवेशन सांगली येथे पार पडले या अधिवेशनाच्या अध्यक्ष सीमाताई बोके होत्या. वैचारिक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय, महिला सक्षमता या अनेक विषयावर नामवंत महिला मान्यवरांचे व्याख्याने झाली. या सोहळ्यातील मौल्यवान वैचारिक विचारांची शिदोरी घेण्यासाठी या अधिवेशनाला रत्नागिरी चिपळूण जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला पदाधिकारी सदस्या जिजाऊंच्या लेकींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. सांगली जिजाऊंच्या अधिवेशनाला लेकी आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्षा शिवमती अनुजा राजे भोसले, रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा शिवमती नेहल चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्षा शिवमती रविना गुजर, रत्नागिरी जिल्हा शहर अध्यक्षा शिवमती वैशाली विचारे,…

Read More

केज येथे पत्रकारांची आरोग्य तपासणी संपन्न मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभरात राबविण्यात येतो हा उपक्रम केज- मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिन निमित्ताने राज्यातील सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते. यावर्षी दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याची संकल्पना परिषदेचे विश्वस्त मा. एस. एम. देशमुख सर यांनी मांडली होती. याच अनुशंगाने केज येथे सर्व पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली. धावपळीच्या जिवनात पत्रकारांनी आपली काळजी घ्यावी, दरवर्षी आरोग्य तपासणी करून काही समस्या असल्यास वेळेत उपचार सुरू करून आपले जीवन सुरक्षित करावे यासाठी हा उपक्रम राबविला जातो. तसेच पत्रकारांना काही आजाराची लक्षणे दिसून आले तर पुढील उपचारासाठी परिषदेच्या वतीने सर्व सहकार्य केले जाते. ३…

Read More

स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज व राजर्षी शाहू विद्या मंदिर केज तर्फे आयोजीत- महात्मा ज्योतिबा फूले स्मृती दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न *—————————————–* चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना बळ देण्याचं काम संस्थेने केले- लक्ष्मणराव बेडसकर केज- प्रतिनिधी स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज व राजर्षी शाहू विद्या मंदिर केज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व उपक्रमशिल कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. केज येथील गटसाधन केंद्राच्या सभागृहात दि. ३० नोव्हेंबर वार शनिवार रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत हर्षोत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मा.श्री.राहुल राजेसाहेब देशमुख अध्यक्ष- स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज तर प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

कृषि सहाय्यक आणि शेतकऱ्यांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील माळेगाव येथे कृषी सहाय्यक आणि शेतकऱ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील माळेगाव येथे कृषि सहाय्यक कमलाकर राऊत यांनी शेतकऱ्यांना वनराई बंधारा आणि त्याचे फायदे यासह वनराई बंधारा बांधण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्या बाबतची तांत्रिक माहिती देवून कोणत्याही खर्चा शिवाय आणि उपलब्ध व टाकाऊ साहित्यातून त्याची निर्मिती करता येते. शेतातील ओढे, नाले यांद्वारे वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी वापरता येते. या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी वनराई बंधारा उभारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. त्या नुसार माळेगाव येथील उपक्रमशील शेतकरी यशवंत दोडके आणि स्वतः…

Read More

देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पा (आण्णा) कुंभार यांच्या पुण्यस्मृती निमित्त कृत्रिम हात पाय व नेत्ररोग तपासणी शिबिर गौतम बचुटे/केज :- देशभक्त पद्मश्री रत्नप्पा कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत कृत्रिम हात व पाय वाटप अने भव्य नेत्ररोग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या बाबतची माहिती अशी की, देशभक्त पद्मश्री रत्नाप्पा कुंभार यांच्या पुण्यतिथी निमित्त रामदास कुंभार सर यांनी दि. २२ डिसेंबर रोजी श्री संत गोरोबा काका कुंभार समाज विकास संस्था, बीड आणि साधु वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हात व पाय गमावलेल्या दिव्यांग बांधवांसाठी अद्यावत टेक्नॉलॉजीव्दारे व उच्च दर्जाच्या फायबर पासून बनविलेले तसेच अत्यंत हलके व मजबूत कृत्रिम हात व पाय…

Read More

युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांनी घेतली आडसकर कुटुंबाची सदिच्छा भेट..! केज- विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आहे. केज मतदारसंघातून नमिताताई अक्षय मुंदडा यांनी पृथ्वीराज साठे यांचा पराभव करून विजय संपादन केला आहे. माजलगाव मतदारसंघातून आश्चर्यकारक रित्या पराभव झालेले रमेशराव आडसकर यांची भेट घेण्यासाठी भाजपाचे युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांनी केज येथील आडसकर यांच्या निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी आडसकर कुटुंबाच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी जेष्ठ नेते, रमेशराव आडसकर, अंकुश रावजी इंगळे, ऋषी भैय्या आडसकर, संदीप भैय्या इंगळे, अतूल दादा इंगळे, रंजित दादा आडसकर व इतर नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. ही सदिच्छा भेट…

Read More