युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांनी घेतली आडसकर कुटुंबाची सदिच्छा भेट..!
केज-
विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आहे. केज मतदारसंघातून नमिताताई अक्षय मुंदडा यांनी पृथ्वीराज साठे यांचा पराभव करून विजय संपादन केला आहे.
माजलगाव मतदारसंघातून आश्चर्यकारक रित्या पराभव झालेले रमेशराव आडसकर यांची भेट घेण्यासाठी भाजपाचे युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांनी केज येथील आडसकर यांच्या निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली.
यावेळी आडसकर कुटुंबाच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी जेष्ठ नेते, रमेशराव आडसकर, अंकुश रावजी इंगळे, ऋषी भैय्या आडसकर, संदीप भैय्या इंगळे, अतूल दादा इंगळे, रंजित दादा आडसकर व इतर नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
ही सदिच्छा भेट येत्या काळातील नवीन राजकीय वाटचालीचा शुभारंभ आहे का अशी चर्चा सुरू आहे.
