केज-बीड रोडवर आढळले अनोळखी पुरुषाचे प्रेत : पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन
गौतम बचुटे/केज :- केज येथे केज-बीड रोडवर, पोलीस स्टेशन समोरील रोडवर दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:०० वा. चे सुमारास एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत आढळून आले आहे. त्या प्रेताचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. उंची ४ फूट ९ इंच, सावळा रंग, अंगात राखाडी रंगाचे स्वेटर आणि डोक्याला भगवा रुमाल. अशा अवस्थेत आढळून आले आहे. प्रेताची ओळख पटलेली नसून पोलिसांनी सदर प्रेत हे उपजिल्हा रुग्णालय केजच्या शवागृहात ठेवले आहे.
मयताच्या बाबतीत जर कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी तात्काळ केज पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्याशी मोबाईल नंबर ९१६८२०३१९८वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.