Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

कृषि सहाय्यक आणि शेतकऱ्यांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 2, 2024No Comments1 Min Read

कृषि सहाय्यक आणि शेतकऱ्यांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील माळेगाव येथे कृषी सहाय्यक आणि शेतकऱ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील माळेगाव येथे कृषि सहाय्यक कमलाकर राऊत यांनी शेतकऱ्यांना वनराई बंधारा आणि त्याचे फायदे यासह वनराई बंधारा बांधण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्या बाबतची तांत्रिक माहिती देवून कोणत्याही खर्चा शिवाय आणि उपलब्ध व टाकाऊ साहित्यातून त्याची निर्मिती करता येते. शेतातील ओढे, नाले यांद्वारे वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी वापरता येते. या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांनी वनराई बंधारा उभारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. त्या नुसार माळेगाव येथील उपक्रमशील शेतकरी यशवंत दोडके आणि स्वतः कृषि सहाय्यक कमलाकर राऊत यांनी श्रमदान करून खत आणि सिमेंटच्या रिकाम्या गोण्यात शेतातील काळी माती भरून शेतातील वाहणारा नाला अडवून वनराई बंधारा उभारला आहे. या बंधाऱ्यात चांगलाच पाणीसाठा झाला असल्याने त्याचा वापर रब्बी पिकांच्या सिंचनासाठी करता येईल.

——————————————————–

तालुक्यात असे वनराई बंधारे उभारण्या संबंधी आमचे अधिकारी व कर्मचारी हे तांत्रिक माहिती देवून मदत करतील. त्यामुळे व्यर्थ वाहून जाणारे पाणी आपल्या पिकांसाठी वापरता येईल.
—- सागर पठाडे,
तालुका कृषि अधिकारी, केज

———————————————————-

शेतकऱ्यांनी व तरुणांनी ओढे, नाले यावर अशा प्रकारे वनराई बंधारे बांधावे. त्यातील पाणीसाठ्याचा वापर करून रब्बी हंगामातील उत्पन्न वाढ होवू शकते.
—- कमलाकर राऊत,
कृषि सहाय्यक
——————————————————–

विजयराज आरकडे

Post Views: 68
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 9
Total Users : 146039
Views Today : 12

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.