केज येथील प्रसिद्ध लिओ जिमचा वर्धापनदिन उत्साहाने साजरा
उत्कृष्ट बॉडी बिल्डर्सचा मान्यवरांनी केला विशेष गौरव
केज-
लिओ जिमचा द्वितीय वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी केज शहराच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम, केज पंचायत समितीचे जेष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी श्री.सुनील केंद्रे साहेब, केज पोलिस स्टेशन चे PSI श्री.राजेश पाटील साहेब, केज तालुका क्रीडा संयोजक श्री.विनोद गुंड सर, डॉ. अमोल तारळकर सर, श्री सचिनभैय्या नेहरकर तसेच विद्याधन कोचिंग क्लासेस चे संचालक श्री.गिरी सर, श्री.नेहरकर सर आणि सर्व लिओ जिम चे मेंबर्स उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गिरी सर यांनी केले. या प्रसंगी लिओ जिम मधील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आठ मेंबर्सना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामधे-
१)श्री.राजेश पाटील सर( PSI,केज पोलिस स्टेशन)
२)श्री.पांडूरंग बनसोडे सर(जि प शिक्षक)
३)आवेश बागवान
४)किरण थोरात
५)प्रकाश गायकवाड
६)वैभव गवळी
७)अदनान खतिब
८)असिम शेख
या मेंबर्सना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
शेवटी जिम चे संचालक श्री.विजय एखंडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.
