केज नगरपंचायत अंतर्गत महा स्वच्छता अभियान २०२४ स्वच्छता पंधरवाडा मोहिमेस प्रारंभ
नगरपंचायत आपल्या दारी या अभियाना अंतर्गत नागरिकांचे विविध प्रश्न सोडविणार- हारूणभाई इनामदार
केज शहरातील सुजान नागरिकांनी स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे-सौ.सीताताई बनसोड
केज/प्रतिनिधी
केज नगरपंचायत अंतर्गत महा स्वच्छता अभियान २०२४ स्वच्छता पंधरवाडा मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन केज नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला आहे.
नगरपंचायत आपल्या दारी या अभियाना अंतर्गत नागरिकांचे विविध प्रश्न सोडविणार आहोत असे प्रतिपादन हारूणभाई इनामदार यांनी केले आहे तर केज शहरातील सुजान नागरिकांनी स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी केले आहे.
केज नगरपंचायत अंतर्गत स्वच्छ संरक्षण २०२४ माजी वसुंधरा अभियान ४. ० स्वच्छता पंधरवडा व नगरपंचायत तुमच्या दारी या दोन योजनेचा शुभारंभ केज नगरपंचायत येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष सौ सीताताई बनसोड जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुण भाई इनामदार मुख्याधिकारी सचिन देशपांडे कार्यालयीन अधीक्षक पठाण साहेब गटनेते राजू भाई इनामदार नगरसेवक जलाल भाई इनामदार माजी नगराध्यक्ष व्यंकटराव हजारे माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव नगरसेवक कलीम सय्यद अमजद सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचे व पत्रकार बांधवांचे केज नगरपंचायत च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना हारुणभाई म्हणाले की, संपूर्ण केज शहरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेच्या माध्यमातून नाल्या व रस्ते साफ करणे ज्या भागांमध्ये रिकामी जागा आहे तेथे झाडे झुडपे आलेली आहेत ते तोडून टाकून संपूर्ण शहर ३० डिसेंबर पर्यंत स्वच्छ करण्याचा मानस आहे.
नगरपंचायत आपल्या दारी या योजने मधून नागरिकांना पाणी लाईट सह नागरिकांच्या विविध अडचणी व प्रश्न सोडून द्या साठी प्रत्येक वार्डामध्ये जाऊन त्यांचे कामे करणार आहोत असे त्यांनी बोलताना सांगितले आहे.
यावेळी नगराध्यक्ष सौ. सीताताई बनसोड बोलताना म्हणाले की, केज शहरातील सुजाण नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता कचरा गाडी आली की कचरा गाडीमध्येच कचरा टाकून सहकार्य करावे त्याचबरोबर शहरातील मोक्याच्या ठिकाणी व रिकामी जागेवर जो नागरिक कचरा टाकेल व कचरा टाकलेला आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याकरता माझ्या केस शहरातील सुजन नागरिकांनी रिकाम्या जागेवर कचरा न टाकता कचरा गाडीमध्ये कचरा टाकून स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वच्छता मोहिमेमध्ये सर्वांनी सहकार्य करावे असे अपेक्षा व्यक्त केली. या स्वच्छता पंधरवडा मोहिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाची व परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच वार्ड क्रमांक १० व १७ मधील स्वच्छतेस सुरुवात करण्यात आली.
याकार्यक्रमास केज नगरपंचायतचे नगरसेवक व कर्मचारी आणि जनविकास परिवर्तन आघाडीचे पदाधिकारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.
