केज येथे पत्रकारांची आरोग्य तपासणी संपन्न
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभरात राबविण्यात येतो हा उपक्रम
केज-
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिन निमित्ताने राज्यातील सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते. यावर्षी दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याची संकल्पना परिषदेचे विश्वस्त मा. एस. एम. देशमुख सर यांनी मांडली होती. याच अनुशंगाने केज येथे सर्व पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
धावपळीच्या जिवनात पत्रकारांनी आपली काळजी घ्यावी, दरवर्षी आरोग्य तपासणी करून काही समस्या असल्यास वेळेत उपचार सुरू करून आपले जीवन सुरक्षित करावे यासाठी हा उपक्रम राबविला जातो. तसेच पत्रकारांना काही आजाराची लक्षणे दिसून आले तर पुढील उपचारासाठी परिषदेच्या वतीने सर्व सहकार्य केले जाते.
३ डिसेंबर मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त केज येथे ही पत्रकार यांनी आरोग्य शिबीरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली तपासणी करून घेतली.
उपजिल्हा रूग्णालय केज येथे पत्रकारांच्या आवश्यक सर्व तपासणी करून सहकार्य केले गेले.
वैद्यकीय अधिक्षक, डॉ. केंद्रे सर, डॉ. मुंडे सर, नागरगोजे सर व सर्व वैद्यकीय कर्मचारी, स्टाफ यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार करून आभार मानण्यात आले.
यावेळी केज तालुका मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
