महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे महा अधिवेशन सांगली येथे उत्साहात संपन्न
सांगली- प्रतिनिधी
मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडचे सातवे महाअधिवेशन सांगली येथे पार पडले या अधिवेशनाच्या अध्यक्ष सीमाताई बोके होत्या. वैचारिक, बौद्धिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय, महिला सक्षमता या अनेक विषयावर नामवंत महिला मान्यवरांचे व्याख्याने झाली. या सोहळ्यातील मौल्यवान वैचारिक विचारांची शिदोरी घेण्यासाठी या अधिवेशनाला बीड जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला पदाधिकारी सदस्या जिजाऊंच्या लेकींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
सांगली जिजाऊंच्या अधिवेशनाला आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड उपाध्यक्षा शिवमती अनुजा राजे भोसले, रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा शिवमती नेहल चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्षा शिवमती रविना गुजर यांची विशेष उपस्थिती होती.
बीड जिल्हा येथून प्रदेश अध्यक्षा शिवमती वर्षाताई माने तसेच बीड जिल्हा अध्यक्ष शिवमती राधाताई सपकाळ, उपजिल्हा अध्यक्ष शिवमती संगीताताई शिदे, शहरअध्यक्ष शिवमती सुजाताताई माने,आदी पदाधीकारी यांनी बीड येथून अधिवेशनला उपस्थिती लावली होती.
या सर्व जिजाऊंच्या लेकींची सांगली अधिवेशनाला उपस्थिती लाभली.
