*केज शहरात दिव्यांग मतदार जनजागृती रॅली संपन्न…* केज/प्रतिनिधी—- आज केज विधानसभा मतदारसंघ 232 (अ.जा.) सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिव्यांग मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.यावेळी रॅलीचा शुभारंभ तहसिल कार्यालय केज येथून तहसिलदार मा.गिड्डे साहेब, तहसिलदार मा.तरंगे साहेब,पंचायत समिती बी.डी.ओ.दिवाणे मॅडम,मा.तालुका गटशिक्षण अधिकारी मा.बेडसकर साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या रॅलीचे आयोजन जिल्हा समाजकल्याण कार्यालय बीड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगाने आपल्या हक्काचे मतदान करावे,मतदान आपला अधिकार आहे मतदानापासून कोणीही वंचित राहू नये असे आवाहन करण्यात आले.या रॅली मध्ये मुख्याध्यापक श्री.विनायक ठोंबरे सर,मुख्याध्यापिका जाधव मॅडम,मुख्याध्यापिका सुर्यवंशी मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रॅलीत सहभागी झाले…
Author: विजयराज आरकडे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा अध्यक्ष विजय दादा साळवे यांचा रमेशराव आडसकर यांना पाठिंबा चळवळीतील सच्चा नेता म्हणून विजय दादा साळवे यांची ओळख माजलगाव- माजलगाव येथे पत्रकार परिषदेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा अध्यक्ष विजयदादा साळवे यांनी अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. माजलगाव मतदारसंघात विजय दादा साळवे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांची दलित समाजातील नागरिक, तरूण व इतर समाजातील जनतेशी चांगले संबंध असून सच्चा चळवळीतील नेता म्हणून त्यांना जिल्ह्यात ओळखले जाते. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे रमेशराव आडसकर यांना दलित समाजातील मतदानाचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमास मुंबई कृषी बाजार समितीचे मा.…
रमेशराव आडसकर यांना मुस्लिम समाजाचा वाढता पाठिंबा माजलगाव मतदारसंघ का आमदार कैसा हो रमेशराव आडसकर जैसा हो.. घोषणांनी परिसर दणाणून निघाला माजलगाव- अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना आता सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. माजलगाव शहरातील मुस्लिम समाजाने रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मोठ्या संख्येने पाठिंबा दिला आहे. कुरेशी मोहल्ला येथे मुस्लिम बांधवांनी बैठकीचे नियोजन करून रमेशराव आडसकर, अशोक आबा डक व अनेक मुस्लिम नेते यांच्या उपस्थितीत अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. माजलगाव का आमदार कैसा हो रमेशराव आडसकर जैसा हो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
रमेशराव आडसकर यांच्या विजयासाठी माय माऊली महीला देखील सरसावल्या या बहिणींची ओवाळणी भावाला विजयी करणार अशी होत आहे चर्चा..! माजलगाव-धारूर-वडवणी- माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर हे शेगडी या चिन्हावर लढत आहेत. यासाठी त्यांनी प्रचारात जोर धरला असून मतदारांच्या प्रत्येक्ष भेटीवर भर दिला आहे. मतदार हाच आपला पक्ष म्हणून ते मतदारसंघात भेटी घेत आहेत. त्यांना मतदारसंघातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक नेते, कार्यकर्ते, युवा मतदार व आता महीला मतदार देखील रमेशराव आडसकर हेच आमदार पाहीजेत यासाठी त्यांचे भेटी दरम्यान मतदारसंघात औक्षण करून मतदान करून निवडून देण्याचा शब्द देत आहेत. गेल्या पाच वर्षापासून रमेशराव आडसकर यांची माजलगाव…
मनसेचे रमेश गालफाडे यांच्या प्रचाराचा साळेगाव येथून शुभारंभ मतदारसंघात रमेश तात्या गालफाडे यांचे मतदारात आकर्षण केज! प्रतिनिधी केज विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार श्री रमेश तात्या गालफाडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज केज तालुक्यातील साळेगाव येथून करण्यात आला. हनुमान मंदिर, संत भगवान बाबा मंदिर येथे नारळ फोडून व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, पीर बाबा दर्गा येथे चादर चडवून प्रचाराला सुरवात केली. 20 नोव्हेंबर ला रेल्वे इंजिन ला मतदान करून रमेश तात्या गालफाडे यांना विधासभेत पाठवून इतिहास रचण्याचे आव्हान केज विधानसभा मतदारसंघातील उपस्थित नागरिकांना केले. यावेळी नागरीकांनी त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. केज मतदारसंघात रमेश तात्या…
दमदार आडसकर यांच्या पाठीमागे तरूण तडफदार मतदार युवा मतदारांच्या सोशल मीडियावर अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांची क्रेज धारूर-वडवणी-माजलगाव- माजलगाव मतदारसंघात यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले रमेशराव आडसकर यांच्याकडे तरूण तडफदार मतदार आकर्षीत होत असल्याचे दिसून येत आहे. माजलगाव चा आमदार दमदार आडसकर, अशा व अनेक पोस्ट व स्टेट्स ठेऊन आडसकर यांना पाठिंबा दाखवत आहेत. रमेशराव आडसकर यांच्या संवाद दौर्यात माजलगाव मतदारसंघातील तरूण, युवक मोठ्या संख्येने सहभागी होत होणारा आमदार रमेशराव आडसकर हेच असावे या घोषणा देत असल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षापासून आडसकर यांनी मतदारसंघात ठेवलेला जनसंपर्क यामुळे जेष्ठ नागरिक, नेते, कार्यकर्ते, युवा तरूण यांचा विश्वास रमेशराव आडसकर यांच्यावर…
केज मतदारसंघातील जुने, नवे कार्यकर्त्यांची मोठ आवळण्यासाठी काकाजी, आ. नमिताताई मुंदडा व अक्षय भैय्या सक्रिय मुंदडा कुटुंबाला मतदारांचा व कार्यकर्त्यांचा मिळतोय भरघोस पाठिंबा केज- अंबाजोगाई केज विधानसभा मतदार संघ हा जवळपास 85 किलोमीटर पर्यंत विस्तारलेला आहे. या मतदारसंघात जिल्ह्यात सर्वात जास्त मतदार आहेत. मतदार संघाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याने इच्छा असूनही काहीवेळा पोहचता येत नाही किंवा अडचणीमुळे जाता येत नाही. नेमकी हीच खुणगाठ कार्यकर्ते व नेतेमंडळी बांधत असतात . आणि ती ‘सल’ निवडणुका येईपर्यंत मनात ठेवून निवडणुकीच्या वेळी आपला अधिकाररुपी हक्क रागाच्या व संतापाच्या माध्यमातून व्यक्त करतात. केज विधानसभा मतदार संघात हे प्रमाण अधिक आहे. आ.नमिताताई मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर…
ए दोस्ती हम नही तोडेंगे म्हणत अशोक आबा डक रमेशराव आडसकर यांच्या साथीला हजर शेतकरी नेते जगदीशजी फरताडे यांचाही मिळाला पाठिंबा माजलगाव- माजलगाव विधानसभा निवडणुक जसजशी पुढे जाऊ लागली आहे तशी रमेशराव आडसकर यांच्यावरील मतदारांबरोबरच स्थानिक नेत्यांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे. रमेशराव आडसकर यांचे जुने दोस्त म्हणून ओळखले जाणारे अशोक आबा डक हे अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांच्या मदतीला धावून आले आहेत. माजी आ. मोहनराव सोळंके, माजी आ. राधाकृष्णन होके पाटील यांची भक्कम साथ व आता अशोक आबा डक, वडवणी तालुक्यातील शेतकरी नेते जगदीश जी फरताडे यांच्या पाठिंब्याने अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांची ताकद दिवसेना दिवस वाढत आहे.
केजमध्ये पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस घेतले ताब्यात गौतम बचुटे/केज (बीड):- केज शहरात बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आणि काडतूस जवळ बाळगून दहशत माजविणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. दि. ७ नोव्हेंबर रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे केज शहरात गस्त घालीत असताना त्यांना सकाळी १०:३० वा. गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, केज शहरातील रोजा मोहल्ला भागात राहणारा जुबेर मुस्ताक फारोखी यांच्या जवळ गावठी कट्टा असुन तो त्याचा धाक दाखवुन या भागात दहशत माजवत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल…
डॉ. अंजलीताई घाडगे या अंबाजोगाई येथे पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी गेल्या मात्र यावेळी नेमके काय घडले..? अंबाजोगाई- प्रतिनिधी महाविआ चे उमेदवार मा. आ. पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी डॉ. अंजलीताई घाडगे या पोहचल्या त्यांनी त्यांच्या सोबत फिरून मतदारांना महाविआ ला मतदान करण्याचे आवाहन केले. अनेक ठिकाणी डॉ. अंजलीताई घाडगे यांचा भव्य सत्कार करण्यात आला, ज्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षाचा आदेश हेच मान्य समजून साठे यांच्यासाठी प्रचार यंत्रनेत सर्व शक्तीने उतरल्या आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांनी मतदारसंघात महाविआ च्या नेते, कार्यकर्ते यांची मने जिंकली आहेत. या प्रचारावेळी उपस्थित नेते, कार्यकर्ते यांनी अंजलीताई घाडगे यांच्या नावाने घोषणा देत त्यांचा सत्कार करण्याची जोरदार…