रमेश आडसकर यांनी उपोषणकर्ते यांची पाण्याच्या टाकीवर चढून घेतली भेट; उपोषणकर्ते यांच्या उपोषणाची दखल घेण्याची प्रशासनाकडे केली मागणी केज- केकतसारणी ता केज येथे सुरू असलेल्या उपोषणाला माजलगाव विधानसभा मतदार संघाचे नेते मा. रमेशराव आडसकर साहेब यांनी भेट घेऊन गावकऱ्यांशी संवाद करून नंतर पाण्याच्या टाकीवर जाऊन उपोषण कर्त्याशी चर्चा करून प्रशासनाला या आंदोलनाची दखल घेण्याची विनंती केली आहे. धनगर समाजाला एस टी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी चार तरुण पाण्याच्या टाकीवर गेल्या सहा दिवसापासुन उपोषण चालु आहे. दि. 6 रोजी उपोषण स्थळी जाऊन सर्व गावकरी व उपोषण कर्ते तरुण यांच्याशी जवळपास दोन तास सकारत्मक चर्चा करून पाण्याच्या टाकीवर जाऊन उपोषणकर्ते यांच्याशी…
Author: विजयराज आरकडे
बजरंग सोनवणे ‘प्रारब्धा’चे धनी..! -इंजि. सुरज लक्ष्मण खोडसे ———————————- बजरंग सोनवणे…हे नाव ६ जुलै १९७० साली सामान्य घरात जन्माला आले. वडील हाडाचे शेतकरी. यामुळे कष्टाशी आणि शेतीशी जवळून संबध आलेला. पण शेतीसोबत समाजकारण, राजकारणही हवे असा विचार मनात घोळू लागला. यातूनच बजरंग बप्पांनी राजकारणात यायचा निर्णय घेतला. आपले ‘प्रारब्ध’ आपणच ठरवू, असे म्हणत हा शेतकरी पुत्र अवघ्या पंचविसाव्या वर्षी गावच्या राजकारणात उतरला. पहिल्याच निवडणूकीत त्यांना विजयाचा टिळा लागला आणि तिथून पुढे त्यांनी राजकारणात कायम चढत्या क्रमाने मार्गक्रमन केले. उपसरपंच ते खासदार ही वाटचाल थक्क करणारी आहे… – [ ] बजरंग सोनवणे पहिल्यांदा गावच्या राजकारणात आले. पहिल्याच प्रयत्नात ते उपसरपंचही झाले.…
लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;
पंकजाताई मुंडे यांची विधानपरिषदेवर निवड मुंबई -भारतीय जनता पक्षाच्या सचिव तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांना पक्षाने विधानपरिषदेवर संधी दिली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाने केली आहे, त्यांच्यासह पाच जणांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. महाराष्ट्र विधानपरिषद साठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर,डॉ परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महा सचिव अरुण सिंह यांनी याबाबत पत्र जाहीर केले आहे.
४१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर बबन वंजारे सेवानिवृत्त पाटोदा भुमीअभिलेख कार्यालयात रंगला सेवापुर्ती सोहळा पाटोदा / प्रतिनिधी बीड तालुक्यातील येळंमघाट येथील रहिवासी व पाटोदा येथील भुमीअभिलेख कार्यालयात दप्तरबंद म्हणून कार्यरत असलेले मा. बबन वंजारे व हे ४१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप अधिक्षक मा.शैलेंद्र गायकवाड व माजलगाव भुमीअभिलेख कार्यालयाचे संजान साहेब हे होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.शैलेंद्र गायकवाड म्हणाले की बबन वंजारे म्हणजे कामाप्रती समर्पित व्यक्ती असून कोणतीही जबाबदारी सोपवली ती वेळे आधी करण्यात पटाईत होते. तसेच कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस नेमकं काम काय,व ते कोणाकडे जावं लागेल आदी गोष्टीचं योग्य मार्गदर्शन करीत असल्याने…
सामाजिक मूल्य जोपासत वाढदिवस साजरा केला पाहिजे – विजयकांत मुंडे सरपंच सौ.रुपाली मुंडेंचा वाढदिवस जनतेच्या सेवेत समर्पित केज ! प्रतिनिधी *वाढदिवसाच्या निमित्ताने खर्चाचा विपर्यास करण्यापेक्षा शालेय विद्यार्थी अथवा गरजू लोकांना मदतीचा हातभार लावून वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक मूल्य जोपासले पाहिजेत असे प्रतिपादन जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी देवगाव येथे केले आहे.* *देवगावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ.रुपालीताई अतुल मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवारी देवगाव येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचा शुभारंभ विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांच्या शुभहस्ते तर युवा नेते अतुल मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.यामध्ये देवगाव जिल्हा परिषद शाळेला LEDTV,LED लाईट,साऊंड बॉक्स इत्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले.तर अंगणवाडी…
ट्रक कार अपघात दोन ठार तिघे जखमी; केज जवळ आज पहाटे घडली घटना केज- मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दि, २६, जून रोजी पहाटे साडेचार वाजता बीडहून अंबाजोगाईकडे येणारा ट्रक क्र, एम.एच. ४४ / ए,बी -८७८६, हा कोरेगावच्या वळणावर थांबलेला होता. त्यावेळी ट्रक चालक हे त्यांच्या ट्रकची पाहणी करीत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने क्र, ए पी -३९ / एस एस -५६५७, उभ्या ट्रकला जोराची धडक दिली यात कारमध्ये बसलेले आंध्र प्रदेशातील अनोळखी एक पुरुष व एक स्त्री यांचा जागीच मृत्यु झाला तर कारच्या पाठीमागे बसलेले श्रुती सकुंता, रा. गुडीवाडा, आंध्र प्रदेश आणि एक अनोळखी पुरूष हे दोघे जखमी झाले आहेत…
मांजरा नदी पुलाच्या नादुरुस्त रस्त्याचे काम आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुरू केज विकास संघर्ष समितीने दोन दिवसांपूर्वी दिला होता बेमुदत रस्ता रोकोचा इशारा केज: खामगांव-पंढरपूर महामार्गावर केज तालुक्यातील मांजरा नदी पुलाजवळ अंदाजे एक किमी रस्ता गेली तीन वर्षांपासून अत्यंत वाईट अवस्थेत होता. या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे, दगड-गोटे व धुळीमुळे प्रवाशी त्रस्त झाले होते. हा रस्ता पूर्णतः केज तालुक्यात येत असल्याने केज विकास संघर्ष समितीने गेली दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा करत अनेक रस्ता रोको आंदोलने केली होती. मागील आंदोलनावेळी हे काम लोकसभा निवडणूक पार पडताच सुरू करू असे सांगितले होते मात्र संबंधित रस्ते बांधकाम कंपनी व एमएसआरडीसी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहून…
दोन ठिकाणी घरफोडी धारदार शस्त्रांचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविले गौतम बचुटे/केज (बीड ):- केज तालुक्यातील साळेगाव येथे मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी झाली असून शस्त्राचा धाक दाखवून घरात झोपलेल्या आई व मुलीच्या गळ्यातील दागिने व नगदी रोख रू. ची चोरी करण्यात आली तर अन्य एकाचे घर फोडले आहे. दि. २२ जून रोजी रात्री २:३० वा. च्या सुमारास रत्नमाला काशिनाथ राऊत व त्यांची बाळंत झालेली मुलगी सौ. दिपाली जगदेव व तिचे बाळ झोपलेले असताना घराचा दरवाजा धक्का मारून उघडला. त्यावेळी घरात श्रीमती रत्नमाला काशिनाथ राऊत आणि त्यांची बाळंतीण झालेली मुलगी सौ. दिपाली जगदेव व तिचे बाळ झोपलेले होते. चोरट्यांनी घरात…
वसंत प्राथमिक शाळेत जागतिक योगदिन साजरा केज- वसंत प्राथमिक शाळा केज येथे जागतिक योगदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. २१ जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण जगभर व आपल्या देशात हा दिन योगदिन म्हणून पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर वसंत प्राथमिक शाळेत विद्यार्थी यांना योग विषयी सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख यांनी देत अनेक योगासने विद्यार्थी यांच्याकडून करून घेतले. यावेळी शाळेचे सह शि. अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर, बालवाडी शिक्षिका हजारे मॅडम, बनसोडे मॅडम यांनीही योग अभ्यासात सहभाग घेतला.