Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

युवकाच्या तत्परतेमुळे केज येथील आठवडी बाजारातुन तीन महिला मोबाईल चोर पकडल्या ! तरूणाचे होत आहे सर्वत्र कौतुक

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 24, 2024No Comments2 Mins Read

युवकाच्या तत्परतेमुळे केज येथील आठवडी बाजारातुन तीन महिला मोबाईल चोर पकडल्या !

तरूणाचे होत आहे सर्वत्र कौतुक

प्रतिनिधी/केज

केज शहरामध्ये जवळपास ३५००० हजार लोकसंख्या आहे . यासाठी दोन आठवडी बाजार भरले जातात त्यामध्ये एक शुक्रवारचा पंचायत समिती मैदानात तर दुसरा मंगळवारचा मंगळवार पेठेत भरतो त्या बाजारासाठी केज तालुक्यातून शेतकरी मोठया संख्येने बाजारात येतात .पाठीमागील कित्येक दिवसांन पासुन केज शहरामध्ये याच आठवडी बाजारामधुन अनेक बाजारासाठी आलेल्या नागरीकांचे मोबाईल चोरण्याच्या घटना घडत होत्या, मात्र पोलिस प्रशासन मोबाईल चोरास पकडण्यात अयशस्वी होत होते अनेक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी, अधिकारी असताना मात्र एकही मोबाईल चोर पोलिसांच्या हाताला लागत नव्हता
दि .२३ जुलै २०२४ वार मंगळवार रोजी एका तरुण मुस्लिम युवकामुळे वा त्याच्या तत्परतेमुळे महिला मोबाईल चोर पकडण्यात आल्या आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि आज शहरातील आठवडी बाजार मध्ये सकाळी साधारण ११ ते १२ दरम्यान अजीज पुरा येथील एकाचा मोबाईल बाजारामध्ये चोरीला गेला होता त्यांच्या बाजुसच राहणाऱ्या सय्यद अल्ताफ ( गौस ) वय २४ वर्षाच्या तरुणाला हि गोष्ट कळाली तो मोबाईल चोर पकडण्यासाठी बाजारामध्ये फिरत असता वा त्याचा शोध घेत असता एक महिला दुसऱ्या बाजारासाठी आलेल्या महिलेच्या पर्समध्ये हात घालताना त्या युवकास दिसली असता. त्याने तात्काळ त्या महिलेजवळ जाऊन तिला मोबाईल चोरताना पकडले व तुझ्या सोबत आणखी कोण कोण आहे ? तिला विचारले असता तिने सुरुवातीला कांहि सांगितले नाही परंतु पोलिस ठाण्यात नेईल असे सांगताच त्या महिलेने माझ्यासोबत आणखी ३ महिला आहेत असे सांगितले व त्या महिला केज बसस्टॅन्ड जवळ बसुन आहेत असे सांगताच बसस्टॅन्ड जवळ गेल्यानंतर त्या महिलांच्या पिशवीमध्ये दोन मोबाईल आढळून आले. त्या मधील एक महिलाने पलायन केले तर तीन महिलाना केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले . या जरी तीन महिला पकडल्या असल्या तरी यांचे मोठे रॅकेट कार्यान्वीत असण्याचे शक्यता आहे. या पकडलेल्या महीलांमुळे मोबाईल चोरांचे रॅकॅट मोठे उघडकीस येणार का? मोबाईल चोरावर कारवाई होणार का ? आदि प्रश्न केज शहरातील जनतेमध्ये पडले आहेत.
मात्र केज शहरातील युवकाच्या कर्तव्यदक्ष पणे केलेल्या कामगीरीचे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 53
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 2
Total Users : 149332
Views Today : 3

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.