Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज पोलिसांनी लातूर जिल्ह्यातून घेतले वाहन चोराला ताब्यात ! अनेक वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल होण्याची वर्तविली जातेय शक्यता

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 20, 2024No Comments3 Mins Read

केज पोलिसांनी लातूर जिल्ह्यातून घेतले वाहन चोराला ताब्यात !

अनेक वाहन चोरीच्या गुन्ह्याची उकल होण्याची वर्तविली जातेय शक्यता

गौतम बचुटे/केज :- जिल्ह्यात अनेक दुचाकी आणि चार चाकी वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. वाहन चोरी करणारे बेमालूमपणे चोरलेल्या वाहनांचे सुटे भाग करून ते अदलबदल करून ही वाहने सर्रास रस्त्यावर वापरीत आहेत. मात्र त्याची ओळख पटविणे आणि तपास करणे खूप अवघड आणि जिकरीचे असताना केज पोलिसांनी वाहन चोरीचा छडा लावून आरोपीला लातूर जिल्ह्यातून ताब्यात घेत त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्या कडून दोन वाहन जप्त केली आहेत. त्या सराईत वाहन चोरा कडून बीड जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनेची उकल होण्याची शक्यता असून केज पोलिसांनी पोलीस खात्याची मान उंचावली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज येथील आबासाहेब लक्ष्मण गवळी यांच्या ताब्यातीलटाटा एसीई क्र. (एम एच-४४/८२१३) लोडींग पिक-अप हे दि.१५ एप्रिल रोजी त्यांच्या घरा समोर उभे केलेले असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेले. सदर वाहनाची त्यांनी शोध घेतला मात्र ते मिळून न आल्याने आबासाहेब गवळी यांनी दि.१६ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ३९४/२०२४ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पोलीस जमादार बाळासाहेब अहंकारे हे करीत होते.
तसेच दि. ७ ,जुलै रोज केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथील फुलचंद भानुदास ठोंबरे याचे महिंद्रा कंपनीचे पिक-अप क्र. (एम एच-२०/ए टी-५३१८) हे त्याच्या घरा समोरून चोरीला गेले होते. फुलचंद ठोंबरे यांनी दि. ९ जुलै रोजी दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात वाहन चोरी करणाऱ्या चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ३८७/२०२४ भा. न्या. सं. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करून त्याचा तपास पोलीस जमादार उमेश आघाव हे करीत होते.

या वाहन चोरी संदर्भात सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी दिलीप गित्ते हे गुप्तपणे तपास घेत असताना त्यांना हे पिक-अप लातूर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशा वरून सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस हवालदार दिलीप गित्ते, पोलीस जमादार उमेश आघाव, पोलीस जमादार बाळासाहेब अहंकारे, पोलीस अंमलदार संतोष गित्ते आणि पोलीस अंमलदार रशीद शेख यांचे पथक लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे रवाना झाले.
पोलीस पथकाने लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून संशयित मुसेफ अब्दुल रहिम कुरेशी, वय (१९ वर्षे), (रा. सराई गल्ली बसवेश्वर चौक, रेणापुर) यास ताब्यात घेतले. त्याच्या कडून केज तालुक्यातून चोरीला गेलेले टाटा एसीई कंपनीचे ४ लाख ५० हजार रु. किंमतीचे पिक-अप आणि महिंद्रा कंपनीचे २ लाख रु. किमतीचे पिक-अप असा एकूण ६ लाख ५० हजार रु. किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

वाहन चोरीतील आरोपी मुसेफ अब्दुल रहीम कुरेशी याला न्यायालयाने २० जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
केज पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी कडून अनेक वाहन चोरीचा तपास लागण्याची शक्यता असून यामुळे केज पोलिसांची मान उंचावली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 51
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 0
Total Users : 147130
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.