उद्या केज येथे रमेश गालफाडे यांचा जनसंवाद मेळावा !
मतदारसंघातील महिला-पुरुषांनी मेळाव्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन
केज : प्रतिनिधी
ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून सर्वच उमेदवार तयारीला लागलेले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे रमेश गालफाडे यांनी केज विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करून गावभेटीवर भर देण्याचे काम सुरू केले आहे. व सामान्य जनतेशी संवाद साधत आहे. त्यांना जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
येत्या ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले जाणार असून त्या पार्श्वभूमीवर गालफाडे यांनी जनसंपर्क वाढवला आहे.गालफाडे यांनी मतदार संघात गावभेटीवर जोर लावला आहे.केज विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी रमेश गालफाडे यांनी पूर्ण ताकद लावली असल्याचे समजले जाते.मुबई,पुणे येथे काही मोठ्या राजकीय नेत्यांची भेट घेऊन केज विधानसभा संदर्भात चर्चा केल्याची देखील मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. रमेश गालफाडे गेल्या अनेक दिवसापासून केज-अंबाजोगाई मतदार संघात मतदार बांधवाच्या भेटी गाठी घेताना दिसत आहेत. निवढणूक लढवण्यासाठी गालफाडे सज्ज आहेत,त्यांना मतदार संघात ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रमेश गालफाडे यांनी मतदारसंघातील जनतेसाठी “जनसंवाद मेळावा’ दि.३० जुलै २०२४ रोजी मुक्ताई फंक्शन हॉल भवानी चौक केज येथे ठेवण्यात आला आहे.या जनसंवाद मेळाव्याची जयत्त तयारी करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी मतदारसंघातील जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश गालफाडे मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.
