रमेश गालफाडे यांच्या जनसंवाद मेळाव्यात
सुषमा अंधारेनी पेटविली केज विधान सभेचे मशाल !
जो कोणी हातात मशाल घ्यायला तयार असेल त्याच्या मनगटात ताकद देवू
—- सुषमा अंधारे
गौतम बचुटे/केज :- भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे आम्ही आरक्षणाची कालमर्यादा वाढविली अशी खोटी माहिती देवून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असून खोटं बोलण्यात देवेंद्र फडणवीस यांचा हात कोणी धरणार नाही. असा घणाघात शिवसेना ऊबाठा गटाच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे करणारे यानी केला. तसेच भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे फेक नरेटिव्ह पसरवत असून उलट ते विरोधकांवर फेक नरेटिव्हचा कांगावा करीत आहेत. असा आरोप त्यांनी भाजपवर केला. तसेच केज विधान सभेसाठी शिवसेना उबाठा आग्रही आहे. जो हातात मशाल घेईल; त्याच्या मनगटात बळ देण्याचे काम करू; परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
तर ज्यांनी हा जनसंवाद मेळावा आयोजित केला ते बहुजन परिषदेचे संस्थापक रमेश तात्या गालफाडे यांनी भाजपच्या आ. नमिता ताई मुंदडा यांच्यावर टीका करताना म्हंटले की, ज्या स्व. विमलताई मुंदडा यांनी बीड जिल्ह्यात सिताफळ संशोधन केंद्र उभारले आणि फळप्रक्रिया उद्योग उभारण्याचे स्वप्न होते. त्या स्वप्नाचा विसर त्यांच्या सुनेला पडला आहे.
दि. ३० जुलै रोजी केज येथील मुक्ताई लॉन्सवर बहुजन विकास परिषदेचे संस्थापक रमेश गालफाडे यांनी जनसंवाद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती ही शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची होती. त्या मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधताना म्हणणाल्या की, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले राजकीय आरक्षण आणि सामाजिक आरक्षण हे वेगवेगळे आहे. परंतु आरक्षणाची कालमर्यादा भाजपने वाढविली असा खोटा कांगावा भाजप करीत आहे. तसेच खाजगी विद्यापीठ आणि कारखान्यात आरक्षण लागू केले नाही. लाडकी बहीण योजना आणणाऱ्या शिंदे सरकारने लाडक्या भाच्याच्या शिक्षणासाठी काय? असा प्रश्न त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांना केला.
यावेळी बोलताना बहुजन विकास परिषदेचे संस्थापक रमेश गालफाडे यांनी ज्या स्व. विमलताई मुंदडा यांनी बीड जिल्ह्यात उद्योग आणून बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी फळ प्रक्रिया उद्योगाची घोषणा केली होती. त्याच्या विसर त्यांच्या सूनबाई आ. नमिता मुंदडा यांना पडला असल्याची जोरदार टीका केली. तर मी कोणत्याही पक्षात नसून खऱ्या मागास प्रवर्गातील व्यक्तींनाच या मतदार संघातून आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळावी. अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि इंडिया आघाडीची उमेदवारी मिळावी अशी सुप्त इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
या मेळाव्याला माजी आ. प्रा सुनील धांडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे, शेकापचे भाई मोहन गुंड, शिवाजी कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते भाई मोहन गुंड, प्रा. हनुमंत भोसले, सेवा निवृत्त गटविकास
अधिकारी मिलिंद गालफाडे, सुभाष गालफाडे, महादेव गालफाडे यांच्यासह केज आणि अंबाजोगाई परिसरातील बांधव व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान या जनसंवाद मेळाव्यात सुप्रसिद्ध गायिका राधा खुडे यांच्या बहारदार गायनाचा देखील कार्यक्रम संपन्न झाला.
