लेकी उंच भरारी घेतील..! मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मुली ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशा मुलींना याचा फायदा होणार असून यामुळे त्यांचे उच्च शिक्षणाचे प्रमाणही वाढणार आहे. उच्च शिक्षण घेऊन या जिजाऊ – सावित्रीच्या लेकी आर्थिक सक्षम होऊन नक्कीच उंच भरारी घेतील. शासनाने मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत जो निर्णय घेतलेला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. शिवमती राधा सपकाळ बीड जिल्हा अध्यक्ष जिजाऊ बिग्रेड महाराष्ट्र
Author: विजयराज आरकडे
*खासदार बजरंग सोनवणे यांचा केज येथे भव्य सत्कार संपन्न* *माझ्या विजयाचे श्रेय आदरणीय शरदचंद्र पवार मनोजदादा जरांगे पाटील आणि मायबाप जनतेला* —- खा. बजरंग सोनवणे *ज्यांनी मोठं केलं त्यांच्याशी प्रमाणिक राहा आणि चेहरा नसण्याऱ्याना चेहरा देण्याचा काम ज्यांनी केलं त्यांना विसरता येत नाही* —- माजी मंत्री अशोकराव पाटील *गद्दार मित्र म्हणून त्यांनी त्रास दिला नसता तर बजरंग सोनवणे खा. झाले नसते !* —- महेबुब शेख गौतम बचुटे/केज :- बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खा. बजरंग सोनवणे हे खासदार पदाची शपथ घेऊन दिल्लीहून पहिल्यांदाच जिल्ह्यात पदार्पण केले त्या निमित्त त्यांचा केज नगरीत भव्य दिव्य सत्कार संपन्न झाला. सोमवार दि. ८ जुलै रोजी बीड…
हिट अँण्ड रण प्रकरण बंदोबस्त कर्तव्यावर निघालेल्या पोलिसांना कारने उडवले एक ठार, एक जखमी नेकनूर- पोलीस भरती प्रक्रिया बंदोबस्त करता कर्तव्यावर निघालेल्या दोन पोलिसांना नेकनूर जवळील बीड रोडवर मंगल कार्यालय शेजारी स्विफ्ट कारने समोरुन जोराची धडक दिली यामध्ये नेकनूर चे रहिवासी आणि सध्या दिंद्रुड येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र श्रीधर नन्नवरे वय 57 हे ठार झाले तर उपनिरीक्षक रमेश नागरगोजे गंभीर जखमी झाले . रोडच्या कडेने चाललेल्या दुचाकीला वेगतील कारने दिलेली धडक मंगल कार्यालयाच्या सीसीटीव्ही मध्ये कॅच झाली आहे. पोलीस भरतीच्या कर्तव्यावर जाताना नेकनूर जवळील बीड रोडवर असणाऱ्या मंगल कार्यालय शेजारी दुचाकी वरील एम एच 23 एके 9397 दिंद्रुड…
न. प. ने घेतलेल्या सार्वजनिक बोअरवेलचे पाणी भरण्यासाठी नागरिकांना करावे लागते जुगाड केज- न. प. च्या वतीने गत काही महिन्यांपूर्वी अनेक वार्डात शिल्लक निधीतून बोअरवेल घेतले होते. वार्ड क्रमांक 4 मध्ये ही घेण्यात आले. सुदैवाने पाणी लागलेही नागरिकांना दिलासा मिळाला परंतु जवळपास वर्ष संपत आले अद्यापही तुट्या किंवा टाकी बसवण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक आप आपले जुगाड वापरून पाणी भरत आहेत. ऐन उन्हाळ्यात देखील या बोअरवेल ने परिसरातील नागरिकांना पाण्याचा थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतू हंडा भर पाणी भरायचे म्हणले तरी तोटी नसल्याने पाणी वाया जात आहे. टाकी नसल्याने कोणीही, केंव्हाही बोअरवेल चालू करून पाणी भरतात त्यामुळे पाणी…
स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा संपन्न *—————————————–* ५ वी नवोदय, शिष्यवृत्तीधारक, एम. टी. एस. ऑलंपियाड, सैनिकी स्कूल व इतर परीक्षेतील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान *============================* *केज प्रतिनिधी: दि. ६ जुलै-* जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ( प्रा. वि. ) या शाळेमध्ये दि. ६ जुलै २०२४ रोजी ५ वी नवोदय, शिष्यवृत्तीधारक, एम. टी. एस. ऑलंपियाड, महाराष्ट्र टॅलेंट सर्च, सैनिकी स्कूल व इतर परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अंकुशरावजी इंगळे अध्यक्ष, जी. वि. शि. मंडळ केज तसेच सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती केज, तर प्रमुख पाहुणे म्हणून…
रमेश आडसकर यांनी उपोषणकर्ते यांची पाण्याच्या टाकीवर चढून घेतली भेट; उपोषणकर्ते यांच्या उपोषणाची दखल घेण्याची प्रशासनाकडे केली मागणी केज- केकतसारणी ता केज येथे सुरू असलेल्या उपोषणाला माजलगाव विधानसभा मतदार संघाचे नेते मा. रमेशराव आडसकर साहेब यांनी भेट घेऊन गावकऱ्यांशी संवाद करून नंतर पाण्याच्या टाकीवर जाऊन उपोषण कर्त्याशी चर्चा करून प्रशासनाला या आंदोलनाची दखल घेण्याची विनंती केली आहे. धनगर समाजाला एस टी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी चार तरुण पाण्याच्या टाकीवर गेल्या सहा दिवसापासुन उपोषण चालु आहे. दि. 6 रोजी उपोषण स्थळी जाऊन सर्व गावकरी व उपोषण कर्ते तरुण यांच्याशी जवळपास दोन तास सकारत्मक चर्चा करून पाण्याच्या टाकीवर जाऊन उपोषणकर्ते यांच्याशी…
बजरंग सोनवणे ‘प्रारब्धा’चे धनी..! -इंजि. सुरज लक्ष्मण खोडसे ———————————- बजरंग सोनवणे…हे नाव ६ जुलै १९७० साली सामान्य घरात जन्माला आले. वडील हाडाचे शेतकरी. यामुळे कष्टाशी आणि शेतीशी जवळून संबध आलेला. पण शेतीसोबत समाजकारण, राजकारणही हवे असा विचार मनात घोळू लागला. यातूनच बजरंग बप्पांनी राजकारणात यायचा निर्णय घेतला. आपले ‘प्रारब्ध’ आपणच ठरवू, असे म्हणत हा शेतकरी पुत्र अवघ्या पंचविसाव्या वर्षी गावच्या राजकारणात उतरला. पहिल्याच निवडणूकीत त्यांना विजयाचा टिळा लागला आणि तिथून पुढे त्यांनी राजकारणात कायम चढत्या क्रमाने मार्गक्रमन केले. उपसरपंच ते खासदार ही वाटचाल थक्क करणारी आहे… – [ ] बजरंग सोनवणे पहिल्यांदा गावच्या राजकारणात आले. पहिल्याच प्रयत्नात ते उपसरपंचही झाले.…
लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात; अर्ज करण्यासाठी लागणारी सविस्तर माहिती; कोणत्या महीला ठरणार पात्र किंवा अपात्र;
पंकजाताई मुंडे यांची विधानपरिषदेवर निवड मुंबई -भारतीय जनता पक्षाच्या सचिव तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांना पक्षाने विधानपरिषदेवर संधी दिली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाने केली आहे, त्यांच्यासह पाच जणांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. महाराष्ट्र विधानपरिषद साठी निवडणूक होत आहे. यामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर,डॉ परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महा सचिव अरुण सिंह यांनी याबाबत पत्र जाहीर केले आहे.
४१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर बबन वंजारे सेवानिवृत्त पाटोदा भुमीअभिलेख कार्यालयात रंगला सेवापुर्ती सोहळा पाटोदा / प्रतिनिधी बीड तालुक्यातील येळंमघाट येथील रहिवासी व पाटोदा येथील भुमीअभिलेख कार्यालयात दप्तरबंद म्हणून कार्यरत असलेले मा. बबन वंजारे व हे ४१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप अधिक्षक मा.शैलेंद्र गायकवाड व माजलगाव भुमीअभिलेख कार्यालयाचे संजान साहेब हे होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात मा.शैलेंद्र गायकवाड म्हणाले की बबन वंजारे म्हणजे कामाप्रती समर्पित व्यक्ती असून कोणतीही जबाबदारी सोपवली ती वेळे आधी करण्यात पटाईत होते. तसेच कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस नेमकं काम काय,व ते कोणाकडे जावं लागेल आदी गोष्टीचं योग्य मार्गदर्शन करीत असल्याने…