हिट अँण्ड रण प्रकरण
बंदोबस्त कर्तव्यावर निघालेल्या पोलिसांना कारने उडवले एक ठार, एक जखमी
नेकनूर-
पोलीस भरती प्रक्रिया बंदोबस्त करता कर्तव्यावर निघालेल्या दोन पोलिसांना नेकनूर जवळील बीड रोडवर मंगल कार्यालय शेजारी स्विफ्ट कारने समोरुन जोराची धडक दिली यामध्ये नेकनूर चे रहिवासी आणि सध्या दिंद्रुड येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र श्रीधर नन्नवरे वय 57 हे ठार झाले तर उपनिरीक्षक रमेश नागरगोजे गंभीर जखमी झाले . रोडच्या कडेने चाललेल्या दुचाकीला वेगतील कारने दिलेली धडक मंगल कार्यालयाच्या सीसीटीव्ही मध्ये कॅच झाली आहे. पोलीस भरतीच्या कर्तव्यावर जाताना नेकनूर जवळील बीड रोडवर असणाऱ्या मंगल कार्यालय शेजारी दुचाकी वरील एम एच 23 एके 9397 दिंद्रुड येथे कार्यरत असलेले नेकनूर चे रहिवाशी पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र श्रीधर नन्नवरे आणि त्यांच्यासोबत असलेले सिरसाळा ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रमेश धोंडीराम नागरगोजे यांना स्विफ्ट कार एम एच 23 बीसी 2108 ने जोराची धडक दिली.यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले . सकाळची वेळ असल्याने अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी या ठिकाणी असल्याने लागलीच नेकनूर पोलिसांना माहिती देण्यात आली. नेकनूर पोलीस स्टेशनचे सपोनि चंद्रकांत गोसावी यांनी अपघातस्थळी धाव घेत तात्काळ दोघाना बीडला हलवले वाटेतच गंभीर जखमी मच्छिंद्र नन्नवरे यांचे निधन झाले .तर नागरगोजे यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एअर बॅग उघडल्याने कारचालक बचावला त्याने लागलीच घटनास्थळावरून पळ काढला होता. वर्षभरात नन्नवरे यांचे पोलीस खात्यातून सेवानिवृत्ती होणार होती. गाव असल्याने ते नेकनूर येथे आले होते .
