केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत ————————————————– गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ११४ सरपंच पदाची सोडत केज येथील तहसील कार्यालयात २५ मार्च रोजी काढण्यात आली. केज तालुक्यात सन २०२० ते २०२५ दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचतीच्या निवडणुकातील सरपंच पदांच्या आरक्षणनाची सोडत दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ११:०० वा केज तहसिल कार्यालयात तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या आदेशा नुसार काढण्यात आली. या वेळी तहसीलदार राकेश गिड्डे यांच्यासह नायब तहसीलदार भंडारे, आशा गायकवाड-वाघ, रामटेके, नन्नवरे हे उपस्थित होते. अनुसूचित जातीसाठी SC- १८ ग्राम पंचायती आरक्षित :- अनुसुचित जातींच्या महिलांसाठी सादोळा, बोरीसावरगाव, मोटेगाव, इस्थळ, लाखा,…
Author: विजयराज आरकडे
आत्मनिर्भर भारतासाठी जल व्यवस्थापन काळाची गरज – डॉ.हनुमंत सौदागर केज – वर्तमान काळात पाणी, नाणी आणि वाणी याचा अत्यंत जपून वापर करणे आवश्यक आहे. कारण या तिन्हीच्याही अतिरिक्त वापरामुळे अनेक समस्या गंभीर निर्माण झाल्या असून भारताला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी जल व्यवस्थापन करणे ही काळाची गरज व भविष्याची मागणी असण्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालय व भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय, केज यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल विभागाच्या वतीने आयोजित 22 मार्च जागतिक जल दिनानिमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. किरणकुमार धिंमधिमे हे होते. यावेळी प्रा. राजश्री कचरे व प्रा. उषा बलाढ्ये…
चष्म्याचे दुकान फोडून नगदी १५ हजार रू. सह ३० हजाराचा मुद्देमालाची चोरी : चोरी करणारा सीसीटिव्ही कैद गौतम बचुटे :- कळंब येथे आठवडी बाजार परिसरात असलेले चष्म्याच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करून काऊंटरमध्ये ठेवलेले रोख १५ हजार रु. आणि चष्मे असा एकूण ३० हजार रु किमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबविले आहेत. शटर उचकटून आत चोरी करताना चोरटा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या बाबतची माहिती अशी की, केज येथील विष्णू लांडगे व सचिन मस्के या दोघांचे भागीदारीमध्ये कळंब जि धाराशिव येथील आठवडी बाजारात चष्म्याचे दुकान आहे. दि. २१ मार्च रोजी त्यांनी सायंकाळी ७:३० वा. चे सुमारास नेहमी प्रमाणे दुकान बंद…
केज येथे जागतिक चिमणी दिवस साजरा ; चिमण्यांना पाण्याची सोय ; केज दि २०(प्रतिनिधी) केज येथील तहसील कार्यालयाकडून जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. नायब तहसीलदार अशोक भंडारे यांनी चिमण्यांना पिण्यासाठी पाणी भांडे व्यवस्था करून चिमणी दिवस साजरा केला. उन्हाळ्यात चिमण्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. चिमण्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. चिमण्यांना वाचवण्यासाठी तहसील परिसरात असलेल्या झाडांना प्लास्टिकचे भांडे बांधून त्यामध्ये पाणी ठेवण्यात आले यामुळे झाडावरच्या चिमण्यांना पाणी उपलब्ध झाले आहे हा उपक्रम सर्व नागरिकांनी हाती घेऊन आपापल्या परिसरात चिमण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. पक्ष्यांना वाचवण्यासाठी कृतिशील उपक्रम राबवावेत असे आवाहन भंडारे यांनी केले
राष्ट्रीय पातळीवरील ABACUS स्पर्धेत Kaij च्या Brilliance Abacus क्लासेसचा चमकदार कामगिरी केज- कोल्हापुर येथे पार पडलेल्या देशपातळीवरील ABACUS स्पर्धेत Kaij येथील Brilliance Abacus क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा सिद्ध करत मोठे यश मिळवले! राष्ट्रीय स्तरावर एकूण 9 विद्यार्थी निवडले गेले होते, मात्र वय लहान व प्रवास दुर असल्याने 3 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत क्लासचे नाव उज्ज्वल केले. दुर्वा दिलीप अंधारे हिने तिसरा क्रमांक पटकावत ब्राँझ मेडल जिंकले! दक्ष विजया काळे आणि मैथिली दिलीपराव अंधारे यांनी पाचवा क्रमांक पटकावला! ही स्पर्धा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब आणि इतर 7 राज्यांतील विद्यार्थ्यांमध्ये झाली, ज्यामध्ये Brilliance…
मनसे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला केज येथे सुरूवात केज- मनसे चे सरचिटणीस व शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष श्री संतोष नागरगोजे व मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांच्या हस्ते मनसे प्रीमियर लीग केज चे उदघाटन आज पार पडले. 16 मार्च ते 22 मार्च पर्यंत क्रिकेट चे सामने होणार असून 22 मार्च ला अंतिम सामना होणार आहे. मनसे प्रीमियर लीग चे आयोजन मनसे चे केज तालुका अध्यक्ष श्री गणेश आप्पा कुलकर्णी यांनी केले आहे,या क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी मनसे चे सरचिटणीस संतोष नागरगोजे साहेब,मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,मनसे शेतकरी सेनेचे प्रदेश सचिव भागवत कांदे,जिल्हा उपाध्यक्ष कल्याण केदार,सुनील…
श्रीक्षेत्र पावनधामच्या बीजोत्सवाला भाविकांची मांदियाळी; महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या कीर्तनाने सांगता: विविध मान्यवरांची उपस्थिती; केज(प्रतिनिधी ) तालुक्यातील प्रति देहू म्हणून प्रसिद्ध असणारे श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथील बीजोत्सवाला भाविकांचा जनसागर लोटला. दि.१६ मार्च वार रविवार रोजी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या काल्याचे किर्तनाने बीजोत्सवाच्या सोहळ्याची सांगता झाली. श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह. भ .प .महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचे आयोजन केले होते. या निमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह. भ. प.महादेव महाराज बोराडे…
स्वच्छता ही माझी जबाबदारी समजून कृतीशील व्हावे– -डॉ.हनुमंत सौदागर केज – साने गुरुजी निवासी विद्यालय केज येथे गांधी तिर्थ स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतचे महत्त्व व स्वच्छता आरोग्या साठी किती आवश्यक आहे विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या व्याख्यानाचे पुष्प गुंफताना प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर यांनी अस्वच्छता ही मानवनिर्मित घाण आहे तूज आहे तुजपाशी परी तु जागा चुकलाशी या उक्तीप्रमाणे स्वच्छतेची सुरुवात सर्वप्रथम स्वतहा पासून सुरू करायला पाहीजे भाषणे देऊन चालणार नाही या साठी आपण स्वतः कृती करायला पाहिजे.पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेसच निसर्गातच सर्वांची निर्मिती झाली आहे. मानव,झाडे झुडपे,पशु पक्षी, प्राणी इत्यादीची निर्मिती झाली परंतु मनुष्याच्या गरजा जरा जास्तच…
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ५० पेक्षा अधिक महिला शिक्षिकांचा सत्कार सोहळा संपन्न बिचारी बनण्यापेक्षा विचारी बना- शैलाताई इंगळे केज – केज येथील जीवन विकास शिक्षण मंडळ तेच संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आयोजित जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तुत्वान तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींचा गुणगौरव सोहळा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मा. वि. या शाळेच्या प्रांगणामध्ये दि. १२ मार्च २०२५ रोजी अत्यंत हर्षोत्साहत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून श्रीमती. शैलाताई इंगळे अध्यक्षा, शालेय व्यवस्थापन समिती स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मा. वि. केज तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमती. पूजा शिवाजीराव शिंदे [ वाकळे ] अन्न सुरक्षा अधिकारी उपस्थित होत्या. याप्रसंगी श्रीमती.…
जिल्हा परिषद शाळेत आता विद्यार्थी गिरवीत आहेत विविध खेळाचे धडे गौतम बचुटे/ :- केज तालुक्यातील साळेगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थी पाठ्य पुस्तकातील धड्या सोबतच आता विविध खेळाचे धडे गिरवू लागले आहेत. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या सुंदर आणि वृक्षाने नटलेल्या शाळेच्या प्रांगणात आता पीएमश्री योजने अंतर्गत विविध खेळाचे धदे विद्यार्थी गिरवित आहेत. गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर, विस्तार अधिकारी चाटे, केंद्रे आणि केंद्र प्रमुख अंकुशे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि वैक्तीक व सांघिक खेळात विद्यार्थी निपुण व्हावेत; म्हणून परिश्रम घेत आहे.…