आनंदवनात ग्रीष्मकालीन उन्हाळी योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिर
केज –
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आनंदवनात
२५ एप्रिल रोजी सहावे ग्रीष्मकालीन योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिर प्रारंभ झाला.
शिबिराचा तिसरा दिवस रविवार रोजी सकाळी ध्वजारोहण व प्रार्थना घेऊन करण्यात आली.
वरोरा पंचायत समिती गटविकास अधिकारी
गजानन मुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती पत्रकार डॉ.हनुमंत सौदागर,क्रिडा प्रशिक्षक तानाजी बायस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उन्हाळी शिबिरामध्ये विविध क्रिडा प्रशिक्षणाचे धडे दिले जाणार आहे. प्रतिवर्षी होणाऱ्या या शिबिरातून शेकडो विद्यार्थ्यांनी पुरस्कार मिळवलेले आहेत.
यावेळी बोलतांना गटविकास अधिकारी गजानन मुंडकर म्हणाले अभ्यासबरोबर मैदानी खेळ आवश्यक आहेत.खेळामुळे शरीर निरोगी अन मन प्रसन्न राहते.
राज्यभरातून या शिबिरासाठी विद्यार्थी शिबिरार्थी म्हणून येत
आहेत.
या शिबिराची वाढती व्याप्ती अभिनंदनीय आहे असे मत व्यक्त केले.
