Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज येथील टोलनाक्या जवळ पीक-अप आणि स्विफ्टचा अपघात : अपघात आठ जखमी

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 27, 2025No Comments2 Mins Read

केज येथील टोलनाक्या जवळ पीक-अप आणि स्विफ्टचा अपघात : अपघात आठ जखमी

गौतम बचुटे/केज : केज-बीड रोडवर गंगा माऊली साखर कारखाना असलेल्या टोल नाक्यावर पासून काही अंतरावर स्विफ्ट आणि पीक-अपच्या अपघातात आठ जण जखमी असून त्यात दोन महिला मुलगा व चार पूरूष यांचा समावेश आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ६:०० वाजता केज मांजरसुंबा रोडवर गंगा माऊली साखर कारखान्यास जवळ असलेल्या टोल नाक्यावर पासून सुमारे २०० मिटर अंतरावर एक भरधाव वेगात असलेली स्विफ्ट कार क्र. (एम एच-१४/एफ सी-२०३८) ही अंबाजोगाईत बीडच्या दिशेने जात होती ती कार आणि पुण्याकडून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील त्यांच्या गावाकडे जात असलेल्या एका पिक-अप क्र. (एम एच १४/एच यु ७१४२) यांची समोरा समोर जोराची धडक झाली. या अपघातात पीक अप चे ड्राइव्हर साईडचे टायर तुटून पडले आहे. अपघातात स्विफ्ट मधील चौघे आणि पीक-अप मधील दोन महिला न दोन मुले असे एकूण आठजण जखमी झाले आहेत.
त्या पैकी आवेज यांच्या हाताला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून जिजाबाई व्यंकट कानगुटे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून ते दोघे गंभीर जखमी आहेत. तसेच अलिफ शेख, महम्मद साबेर शेख, अझर आणि शोभा नाना कानगुटे यांच्यासह दोन मुले असे एकूण आठजण जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव आणि आणि त्यांचे सहकारी हे घटना स्थळी हजर झाले
त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला घेवू रस्ता सुरळीत केला तर अँब्युलन्सचे पायलट बारगजे यांच्या मदतीने जखमी रुग्णांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 195
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 2
Total Users : 147132
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.