केज येथील स्वामी समर्थ मठाच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षा निमित्त विश्वशांती व विश्वकल्याणासाठी १२ मे रोजीपंचायतन यज्ञ;
यज्ञकुंडाचे माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या हस्ते भूमी पूजन संपन्न
केज :-
शहरातील देशपांडे गल्लीतील स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार स्थापन केलेल्या पादुकांना दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने स्वामी समर्थ मठाच्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवी वर्षा निमित्त विश्वशांती व विश्वकल्याण साठी दिनांक ५ मे ते १२ मे कालावधीत स्वामी समर्थ मठ केज येथे यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे या यज्ञकुंडाचे भूमिपूजन माजी मंत्री अशोकराव पाटील,रमेश आडसकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शनिवार दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता करण्यात आले.
केज येथे स्वामी भक्त प पु श्रीमंत नानासाहेब महाराज देशपांडे यांनी स्वामी समर्थ यांच्या आज्ञे नुसार केज शहरातील देशपांडे गल्ली मध्ये स्वामी समर्थांच्या स्वामी संप्रदायाच्या कार्यासाठी मठाची स्थापना करत स्वामी समर्थांच्या संगमरवरी पादुकांची स्थापना केली त्यास दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने समर्थ मठात शतकोत्तर रोप्यमहोत्सवी वर्षाचे आयोजन करण्यात आले आहे त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मध्ये प्रामुख्याने स्वामी समर्थ नामाचा दिड कोटी जप करण्यात येत आहे , दिनांक ५ मे ते १२ मे या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती ,सकाळी स्वामी महाराजांना रुद्राभिषेक, व विश्वशांतीसाठी व ल्यांसाठी पंचायतन यद्न्य करण्यात येणार आहे या यज्ञाच्या यद्न्य कुंडाचे माजी मंत्री अशोकराव पाटील, रमेश आडसकर, यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी स्वामी भक्त प पु श्रीमंत नानासाहेब महाराज देशपांडे यांचे वशंज
भाऊसाहेब देशपांडे ,प्रशांत देशपांडे नायब तहसीलदार सचिन देशपांडे ,प्रवीण देशपांडे,समीर देशपांडे,गणेश देशपांडे , सुनील देशपांडे ,यांच्यासह नगरसेवक पशुपतीनाथ दांगट, पत्रकार व शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
