Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने रंजित कांबळे यांनी केले गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप !

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 12, 2025No Comments2 Mins Read

दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने रंजित कांबळे यांनी केले गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप !

गौतम बचुटे/केज-
केज येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवाचे औचित्य साधून शिक्षणासाठी पायपीट कराव्या लागत असलेल्या गरजवंत विद्यार्थ्यांना दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने महाराष्ट्राच्या महागायिका कडुबाई खरात यांच्या उपस्थितीत संयोजक रंजित कांबळे यांनी सायकलींचे वाटप केले.

या बाबतची माहिती अशी की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्व वंदनीय भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलीत आणि वंचित समाजाला सांगितले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ती जे प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असा मूलमंत्र दिला. तसेच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला.
दरम्यान आजही अनेक गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. अनेक गावात वाहनांची सोय नसते. या सर्व बाबींचा विचार करून दिपक भाऊ कांबळे युवा मंचचे संस्थापक रंजित कांबळे यांच्या संकल्पनेतून भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून दि. १० एप्रिल रोजी गरजू विद्यार्थ्यांना महात्मा फुले नगर येथे दिपक कांबळे, एल एफ सी ग्रुपचे कपिल मस्के महाराष्ट्राच्या महागायिका कडुबाई खरात यांच्या हस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले.
यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे, कडूबाई खरात, एल एफ सी ग्रुपचे कपिल मस्के, जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, तालुका सरचिटणीस पत्रकार गौतम बचुटे, जेष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव बनसोडे, सुदेश दादा सिरसट, रमेश निशिगंध, सुरज काळे, रोहीत कांबळे, राहुल काळे, हरीश गायकवाड, प्रशांत हजारे, रवी गायसमुद्रे, हरेंद्र तुपारे, दादाराव धेंडे, विनोद शिंदे, गौतम गंडले यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि माण्यवरांची उपस्थिती होती.

विजयराज आरकडे

Post Views: 137
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 9
Total Users : 149389
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.