Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

आयुष्य खुप सूंदर आहे ते जगता आले पाहिजे- उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 24, 2025No Comments3 Mins Read

आयुष्य खुप सूंदर आहे ते जगता आले पाहिजे- उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर

केज प्रतिनिधी:
जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीत नाही तर आपल्या मनात रुजवले पाहिजे. आरश्यात दिसणाऱ्या स्वतःला आहे तसं स्वीकारायला शिका खरंच आयुष्य खुप सूंदर आहे, फक्त ते जगता आले पाहिजे. आयुष्यामध्ये चढ-उतार हास्य-अश्रू यश-अपयश येतच असतात. हे सर्व माणसाच्या जीवनाचा भाग आहे. आणि हेच जीवनाला सुंदर आणि खरोखर जगण्यासारखे बनवतात. नातेसंबंध टिकवण्यासाठी, संवाद, आदर, विश्वास आणि प्रामाणिकपणा अत्यंत आवश्यक आहे. तसेच या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसा-माणसांमधील संवाद हरवत चाललाय. तेंव्हा एकमेकांशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. आपले विचार, भावना आणि अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त करणे, एकमेकांच्या मतांचा, भावनांचा आदर करणे, एकमेकावर विश्वास ठेवणे, विश्वासघात टाळणे, परस्परांना समजून घेणे वेळप्रसंगी अडचणीच्या वेळी साथ देणे, त्यांच्या चांगल्या कामाची प्रशंसा करणे निर्माण होणारे वाद मिटवणे, कठीण परिस्थितीतही एकमेकांना साथ देणे एकमेकांचा आधार बनणे तसेच नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगर येथील उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केले.

केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये दि. २३ एप्रिल रोजी जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्रीमती. अंजली अभय धानोरकर, उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर या उपस्थित होत्या तर अध्यक्ष म्हणून श्री. नंदकिशोरजी मुंदडा हे उपस्थित होते. याप्रसंगी जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे सचिव जी. बी. गदळे, सहसचिव उपेंद्र कोकीळ, डॉ. वसुदेव नेहरकर, नारायण अण्णा अंधारे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, प्राचार्य शंकर भैरट, प्रा. वि. चे मु. अ. वसंतराव शितोळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी लाभलेल्या उपस्थित पाहुण्यांचा परिचय सुरेखा डांगे मॅडम यांनी दिला. चौथे पुष्प गुंफताना ” रंग मनाचे रंग नात्याचे ” या विषयावर बोलताना अंजली धानोरकर पुढे म्हणाल्या, एकत्र कुटुंबपद्धती हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य होते. परंतु आता विभक्त कुटुंबपद्धती दिसून येते. तेंव्हा जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जात असताना एकमेकांवरील अतूट विश्वास किती महत्त्वाचा असतो हे २०१३ मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ येथे अचानक आलेल्या प्रलयकारी महापुराच्या अनुषंगाने सांगितले. या महाप्रलयाने हजारो लोकांच्या जीवनावर परिणाम झाले. त्यामुळे बाधितांचे जीवन उध्वस्त झाले. त्या प्रलयामध्ये विजयसिंह नामक तरुणाला स्वतःची पत्नी लीला हिला गमवावे लागले. हे सत्य त्याच्या कुटुंबाने स्वीकारले, परंतु त्याचा मात्र ठाम विश्वास होता की कधीतरी ती मला भेटल, या विश्वासाने तो तिथेच राहिला. या अतूट विश्वासाला १९ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. शेवटी त्या विश्वासाचे सार्थक झाले व त्या दोघांची भेट झाली. एवढा अतूट विश्वास एकमेकांवर असला पाहिजे. यावेळी अशा अनेक प्रसंगांना आपल्या वर्णनातून रेखाटण्याचा प्रयत्न अंजलीताई धानोरकर यांनी केला.

अध्यक्षीय समारोपात नंदकिशोरजी मुंदडा म्हणाले, स्व. विश्वंभर कोकीळ हे संघर्ष करण्याची ताकद असणारे व्यक्तिमत्व होते. परखडपणे मत व्यक्त करणे हा त्यांचा स्वभाव होता तर सुसंवाद साधून प्रश्न सोडविणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. अशा व्याख्यानमालेतून वैचारिक पिढी निर्माण होते. व अशी पिढी कुटुंबापलीकडे समाजाप्रती अथवा देशासाठी निष्ठेने कार्य करते. सध्याच्या काळामध्ये नाती विस्कटली जात आहेत, परंतु आपल्या अंतर्मनात चांगले भाव असतील तर चुकीच्या गोष्टीचे समर्थ न करता समाजामध्ये चांगले विचार पेरण्याचा निश्चित प्रयत्न होऊ शकतो. शेवटी त्यांनी अंबेजोगाई मधील वसंत व्याख्यानमालेचे स्वरूपही उपस्थित श्रोत्यांना सांगितले.

कार्यक्रमाचे सुञसंचलन अपर्णा देशपांडे मॅडम यांनी केले तर आभार गौरी जगताप मॅडम यांनी मानले.

विजयराज आरकडे

Post Views: 108
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 4
Total Users : 146044
Views Today : 3

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.