Author: विजयराज आरकडे

शिवशंभु युवा प्रतिष्ठान व जनविकास फाउंडेशनतर्फे केजमध्ये भव्य शारदीय नवरात्र महोत्सव – स्वर्णगिरी मंदिर देखावा आकर्षणाचे केंद्रबिंदू केज (प्रतिनिधी) – शिवशंभु युवा प्रतिष्ठान, समर्थनगर व जनविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केज शहरात यंदा प्रथमच शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त स्वर्णगिरी मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला असून, तो शहरातील नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. समर्थनगर येथे उभारण्यात आलेल्या या देखाव्याला महिला, लहान मुले व तरुण वर्ग मोठ्या संख्येने भेट देत आहेत. धार्मिक वातावरण, पारंपरिक सजावट व भक्तिभावाने भारलेली संध्याकाळ या देखाव्याच्या ठिकाणी अनुभवता येत आहे. महोत्सवात दररोज महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्या टिपरी नृत्य, भक्तीगीत, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून…

Read More

वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आपत्ती ग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत करणार- रमेशराव आडसकर केज- केज शहरातील वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या प्रसंगी व्यासपीठावर मा. रमेशराव आडसकर, रणजीतभैया आडसकर, प्राचार्य श्री. फावडे, चेअरमन श्री. सुरेश शिनगारे, सचिव श्री. बालासाहेब घुगे व संचालक मंडळ उपस्थित होते. सभेची सुरुवात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली व सरस्वती पूजनाने झाली. संस्थेचे प्रेरणास्थान बाबुरावजी आडसकर यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. सध्याच्या अवर्षण व निसर्ग संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पाहुणे मा. रमेशराव आडसकर यांच्या सूचनेनुसार कोणताही औपचारिक स्वागत सोहळा न घेता…

Read More

केज येथील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेस खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद खेळांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो—डॉ हनुमंत सौदागर केज- शहरालगत असलेल्या माऊली विद्यापीठ संचलित भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाच्या मैदानावर तालुकास्तरीय दोन दिवसीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग आणि केज तालुका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाचे डॉ हनुमंत सौदागर हे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ हनुमंत सौदागर म्हणाले खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि सराव याचा वापर केल्यास यश निश्चित मिळते असे मत व्यक्त केले. विजेत्या संघाचे अभिनंदन करून…

Read More

जनावरे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याला तहसिलदार गिड्डे यांनी दिला ऑन दी स्पॉट मदतीचा धनादेश चिखल तुडवीत आणि पाण्यात वाट काढीत तहसीलदार शेतकऱ्यांच्या मदतीला धावले गौतम बचुटे/केज :- विविध राजकीय पक्षाचे पुढारी आणि नेते हे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलास देऊन त्यांचे मनोबल वाढवून मानसिक आधार देण्याचे काम करीत आहेत. तसेच केजचे तहसीलदार यांनी सुद्धा चिखल तुडवीत आणि पाण्यातून काट्या काट्याचा रस्ता तुडवीत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवीत आहेत. केज तालुक्यातील एका शेतकऱ्यांचे म्हशी आणि गाय पाण्यात अडकलेली असताना त्यांना वाचविण्यासाठी दिवसभर आटोकाट प्रयत्न करूनही त्यातील तीन जनावरे दगावली. त्या शेतकऱ्याला तहसिलदार यांनी ऑन दी स्पॉट मदतीचा धनादेश…

Read More

गंगा माऊली शुगरचा चौथा हंगाम बॉयलर अग्नी प्रज्वलन (यावर्षी कारखाना विक्रमी गाळप करणार) केज- केज तालुक्यासह बीड व धाराशिव जिल्हयात गंगा माऊली शुगर ने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून अल्पावधीत शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या गंगा माऊली शुगरचे चौथे बॉयलर अग्निपदन गोटेगाव चे सरपंच तथा गंगा माऊली शुगरचे कौटुंबिक स्नेही शहाजी पवार व त्यांच्या पत्नी यांच्या शुभ हस्ते व हभप किसन महाराज पवार, हभप उद्धव बापू आपेगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

Read More

अर्चना कुटे यांना सीआयडी पथकाकडून केज न्यायालयात केले हजर; महागडी दुचाकी केज पोलिसांनी केली जप्त गौतम बचुटे/केज :- ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी सी आय डी ने पुणे येथे ताब्यात घेतलेल्या अर्चना कुटे यांना आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी पहाटे ४:०० वाजता पुणे येथून केज येथे आणण्यात आले. त्यांना १२:३० वाजता केज येथील न्यायालयात हजर करण्यासाठी सीआयडी पथकाने घेऊन गेले आहेत. त्यांच्यावर केज आणि नांदुरघाट येथील ठेवीदारांचे ठेवी बुडविल्याचा आरोप आहे. १७ लाखाची दुचाकी जप्त ——————————— :- तीन दिवसा पूर्वी सीआयडी च्या पथकाने त्या वापरीत असलेली बी एम डब्ल्यू कंपनीची सुमारे १७ लाख रु. किमतीची त्यांची एक दुचाकी केज पोलिस ठाण्यात…

Read More

खा. समर्थक विद्यमान सरपंच गोविंद ससाणे यांचा रा. कॉ.पा. मध्ये प्रवेश केज- तालुक्यातील सोनीजवळा येथील विद्यमान सरपंच गोविंद ससाणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या उपस्थितीत बीड येथे जाहीर प्रवेश केला आहे. खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्या गटातून ते निवडणूक लढवून सरपंच पदी विराजमान झाले होते. खा. सोनवणे यांना या माध्यमातून हाबाडा बसल्याचे बोलले जात आहे.

Read More

फलोत्पादन विभागाची जागा केज नगरपंचायतला हस्तांतरित , केज वासियांसाठी आनंदाचा क्षण– गटनेते हारुणभाई इनामदार केज- केज नगरपंचायत चे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) गटनेते हारुणभाई इनामदार यांनी आज केज येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद आयोजित केली होती . सदरील पञकार परिषदेला गटनेते हरूनभाई इनामदार, नगराध्यक्ष सौ.सिताताई बनसोड, नगरसेविका पदमीनबाई शिंदे ,राजू इनामदार ,जलालभाई इनामदार व पञकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पत्रकार परिषदेत त्यांनी केज शहरातील मोक्याची जिरायत खात्याची जागा केज नगरपंचायतला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शिफारशीनुसार हस्तांतरित झाली असल्याची माहिती दिली . केज शहरातील व्यापाऱ्यांना यामुळे व्यापारी संकुलाच्या माध्यमातून स्वस्थ दरात नगरपंचायत कडून गाळे व दुकानासाठी जागा मिळण्याचा…

Read More