ज्ञानदीप कोचिंग क्लासेस शिव जयंती सोहळा उत्साहात संपन्न;
नांदेड-
छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत ज्ञानदीप कोचिंग क्लासेस खंडोबा चौक नांदेड येथे काल कुळवाडी भूषण, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन दिग्रसकर( मुख्याध्यापक गोविंदेश्वर प्राथमिक शाळा नांदेड) प्रमुख मार्गदर्शक: सुप्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. नागराज मगरे प्रमुख पाहुणे सिताराम सोनटक्के सर माजी मुख्याध्यापक दत्ताजी लिंबोळे उद्योजक गंगाधरराव मुळे पाटील श्रीनिवास हार्डवेअर पंडितराव मुळे पाटील त्र्यंबक उदबुके केशव भावे श्री.जाधव सूर्यकांत आचने मोरे सुग्रीव तसेच कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या जीवनावर पेपर घेण्यात आला. त्यामध्ये प्रथम येणारे विद्यार्थी 1)पुनम रणवीर 2) आर्या सूर्यवंशी 3) शौर्य आढाव द्वितीय क्रमांक 1) चिरायू सूर्यवंशी तृतीय क्रमांक1) अंश पाईकराव चौथा क्रमांक1) अन्वये मगरे पाचवा क्रमांक 1) हनुमान बसवंते 2) विवेक कांबळे सर्व विद्यार्थ्यांना मानवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टरच्या रूपामध्ये बक्षीस देणारे सिद्धार्थ पतंगीराव यांनी दिले. भाषणामध्ये सहभागी विद्यार्थी:1) अनुष्का येवले 2) स्नेहा देशमुखे 3) अक्षरा बसवंते 4) कनिका काळबांडे 5) अंश पाईकराव या विद्यार्थ्याने सहभाग घेतला. सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
