Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज नगरपंचायत मधील प्रधानमंत्री आवास योजनेतील घोटाळा प्रकरणी माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी व्यक्त केले आपले मत;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 3, 2026No Comments2 Mins Read

केज नगरपंचायत मधील प्रधानमंत्री आवास योजनेतील घोटाळा प्रकरणी माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी व्यक्त केले आपले मत;

केज दि ३(प्रतिनिधी)

केज नगरपंचायत मधील
पंतप्रधान आवास योजना (शहरी)’ अंतर्गत ३ कोटी ६० लाख रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर प्रकार चौकशी समिती कडून उघड झाला आहे. या गैरव्यवहार प्रकरणातील अधिकारी पदाधिकारी यांसह सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केज नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी केली आहे.
गोरगरिबांचे घरे गिळंकृत केली गेली. या प्रकरणावर आदित्य पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणातील दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून अपहार झालेली पूर्ण रक्कन लाभार्थ्यांना
मिळावी.दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी
केज नगरपंचायतचे
माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी केली आहे.
पंतप्रधान आवास योजनेतून गोरगरिबांना टप्प्याटप्याने आर्थिक सहाय्य देण्यात येते. मात्र केज नगरपंचायतीमध्ये हा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी बनावट नोंदी, खोटी कागदपत्रे आणि संगणकीय
हेराफेरी करून शेकडो पात्र लाभार्थ्यांना अद्याप संपूर्ण रक्कम मिळालेली नसताना निधी मात्र पूर्णपणे उचलल्याचे उघड झाले

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत गरीब व गरजू नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. सदर अहवालात शासकीय निधीचा चुकीचा वापर अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

—चौकट—-

आमच्या कार्यकाळात गरिबांना घरे उपलब्ध करून दिली.मात्र नंतरच्या काळात असे गंभीर प्रकार घडताहेत ही संतापजनक बाब आहे.

————–

या प्रकरणी आदित्य पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, “गरीबांच्या घरांसाठी असलेली योजना काही मोजक्या भ्रष्ट लोकांसाठी कमाईचे साधन बनली आहे. हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून, गरिबांच्या हक्कांवरचा घाला आहे. अशा तीव्र संतापजनक भावना आदित्य पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

विजयराज आरकडे

Post Views: 180
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 3
Total Users : 149383
Views Today : 11

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.