लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
केज -( प्रतिनिधी )
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त दि.१९ फेब्रुवारी गुरुवार रोजी लक्ष्मी नर्सिंग स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पुजन मधुर भैय्या मुंडे, उषाताई मुंडे यांनी करुन अभिवादन केले यावेळी प्राचार्य रवि पवारसर यांच्यासह प्रथम द्वितीय वर्षाचे विद्यार्थ्यी व विद्यार्थीनी सहभागी होऊन ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
केज शहरापासुन जवळच असलेल्या बीड रोडवरील सिध्दीविनायक शैक्षणिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत (बापू) मुंडे यांनी सुरु केलेल्या लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलमध्ये गुरुवार दि.१९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.गुरुवारी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला संस्थेच्या सचिव उषाताई मुंडे व सहसचिव मधुर भैय्या मुंडे यांनी पुष्पहार अर्पण करुन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य रवि पवारसर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे महत्व मधुर भैय्या मुंडे व उषाताई मुंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगीतले.नर्सिंग स्कूलच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यी व विद्यार्थीनीनी शिवाजी महाराजाना अभिवादन करुन ही जयंती उत्साहात साजरी केली.यावेळी नर्सिंग स्कूलचे शिक्षक व इत्तर कर्मचारी उपस्थीत होते.
