Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे; विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी जिंकली प्रेक्षकांची मने उपस्थितीतांकडून कौतुकाचा वर्षाव;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 7, 2026No Comments2 Mins Read

राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे;

विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी जिंकली प्रेक्षकांची मने उपस्थितीतांकडून कौतुकाचा वर्षाव;

केज-
राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा ही शहरातील नामांकित शाळा आहे.ही शाळा वर्षानुवर्ष संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य करीत आहे असे प्रतिपादन केजचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.सुनिल केंद्रे यांनी केले.राजर्षी शाहू विद्या मंदिर केज शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उदघाटक म्हणून उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.
स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर केज शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपले कलागुण सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन दिप प्रज्वलन व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले.यावेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.ॲड.श्री.राजेसाहेब देशमुख,उदघाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी मा.श्री.सुनिल केंद्रे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.दत्तात्रय चाटे,सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.हनुमंत भोसले,नगरसेवक मा.श्री.बाळासाहेब गाढवे तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्था सचिव मा.श्री.गदळे जी.बी,सहसचिव मा.श्री.अशोकराव डांगे,कोषाध्यक्ष मा.श्री.सय्यद नवाबसाहेब,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी.इतर उपस्थितीमध्ये ॲड.एस.बी.मस्के,शिक्षक पतसंस्थेचे संचालक अंबादास काळे,शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री. डापकर एस. ए. व श्री.चौधरी बी.डी.यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम,राष्ट्रीय एकात्मता,पाण्याचे महत्व,अंधश्रद्धा निर्मूलन याबाबतचे गीत व अभिनय सादर करत सामाजिक संदेश दिला.सांस्कृतिक गीतातुन देशात विविध जाती-धर्माचे-पंथाचे लोक राहत असले तरीही राष्ट्रहितासाठी सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे असा संदेश दिला.महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा सांगणारे लोकगीत,लावणी,भक्ती गीत यांनी कार्यक्रम आणखीनच बहारदार केला.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी क्रमिक अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा,उपक्रम,सांस्कृतिक कार्यक्रम या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात.भविष्यातील कलाकाराचा पाया इथेच घातला जातो यासाठी शाळेकडून अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.यादव व्ही.बी.यांनी केले तर आभार श्री.गदळे जी. बी.यांनी मानले.सर्वश्री देशमुख ए.डी,क्षीरसागर आर.एस,डिरंगे जी. बी,मस्के जे.आर.श्रीमती गायकवाड ध्वजा,श्रीमती जाधव अनिता यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.उत्कृष्ट नियोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले.स्नेहसंमेलनासाठी पालकांचा शेवटपर्यंत उदंड प्रतिसाद मिळाला.

विजयराज आरकडे

Post Views: 79
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 3
Total Users : 149383
Views Today : 11

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.