Author: विजयराज आरकडे

केज येथील स्वामी समर्थ मठाच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षा निमित्त विश्वशांती व विश्वकल्याणासाठी १२ मे रोजीपंचायतन यज्ञ; यज्ञकुंडाचे माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या हस्ते भूमी पूजन संपन्न केज :- शहरातील देशपांडे गल्लीतील स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार स्थापन केलेल्या पादुकांना दीडशे वर्ष पूर्ण होत असल्याने स्वामी समर्थ मठाच्या शतकोत्तर रोप्यमहोत्सवी वर्षा निमित्त विश्वशांती व विश्वकल्याण साठी दिनांक ५ मे ते १२ मे कालावधीत स्वामी समर्थ मठ केज येथे यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे या यज्ञकुंडाचे भूमिपूजन माजी मंत्री अशोकराव पाटील,रमेश आडसकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शनिवार दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता करण्यात आले. केज येथे स्वामी भक्त प…

Read More

दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने रंजित कांबळे यांनी केले गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप ! गौतम बचुटे/केज- केज येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवाचे औचित्य साधून शिक्षणासाठी पायपीट कराव्या लागत असलेल्या गरजवंत विद्यार्थ्यांना दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने महाराष्ट्राच्या महागायिका कडुबाई खरात यांच्या उपस्थितीत संयोजक रंजित कांबळे यांनी सायकलींचे वाटप केले. या बाबतची माहिती अशी की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्व वंदनीय भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलीत आणि वंचित समाजाला सांगितले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ती जे प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असा मूलमंत्र दिला. तसेच शिका संघटित व्हा आणि…

Read More

खासदारांनी घेतली सलग तीन तास रेल्वेची मॅरेथॅान बैठक : बीड-नगर-मुंबई रेल्वे सुरु करण्याचे दिले निर्देश बीड: अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम या पूर्वीच्या बैठकांमधे निश्चित करुन देण्यात आलेल्या वेळेत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत असतानाच कामाची गती मंदावू देऊ नका. बीड ते परळी रेलमार्गासाठी बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांना भुसंपादनाचा मावेजा देताना काटकसर करु नका. भुसंपादनाची उर्वरित प्रकरणे तातडीने मार्गी लावा. विद्युतीकरणाच्या कामात येत असलेले अडथळ्यांवर मार्ग काढीत असताना रेल्वे क्रॉसिंगची काही कामे अर्धवट असून ती तातडीने पुर्ण करा. रेल्वेमार्गास विद्युत जोडणीच्या कामाला गती द्या, अशा सुचना खा.बजरंग सोनवणे यांनी केल्या. दि.११ एप्रील रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता रेल्वे विभागाच्या बैठकीला…

Read More

केज तालुक्याला रेल्वे मार्गाशी जोडण्याची केजवासीयांची मागणी केज : केज हे बीड जिल्ह्याचे सर्वात जुने तालुका ठिकाण आहे. केज तालुक्यात पालेभाज्या-फळभाज्या सोबतच आता नवीन वैज्ञानिक शेती प्रयोग करून फळांची व पिकांची निर्मिती केली जात आहे. मात्र आधुनिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केज तालुक्यात दळ ण-वळणासाठी अनुकूल असणारी रेल्वेची सेवा उपलब्ध नाही. सध्या केंद्र शासनाने धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या 240 किमी च्या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला 14 फेब्रुवारी 2025 च्या पत्रानव्ये मंजुरी दिली आहे. या अंतर्गत हा मार्ग धाराशिव-कळंब-बीड असा जाणार असेल तर तो धाराशिव-कळंब-केज-बीड असा करावा अशी कळंब व केजच्या जनतेची मागणी आहे. याशिवाय येडशी-कळंब-केज-अंबेजोगाई-परळी किंवा अहमदनगर-पाटोदा-केज-अंबेजोगाई-घाटनांदूर या मार्गानेही केजला रेल्वे कनेक्टिव्हिटी दिली…

Read More

पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार मुंबई – पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकर काढण्यात येईल, पत्रकार सन्मान योजनेच्या अटी शिथिल करण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. पत्रकारांच्या दहा संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भातील आक्षेप आणि शंकाच्या संदर्भात सह्याद्रीवर ही बैठक झाली. बैठकीस गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या अखेरीस एस.एम.देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्याचा मुद्दा उपस्थित केला. “पत्रकार संरक्षण कायदा झाला पण कायद्याचं नोटिफिकेशन निघाले नसल्याने राज्यात कायदा अंमलात आलेला नाही ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लगेच नोटिफिकेशन काढण्याची…

Read More

राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत बक्षीस वितरण व निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न केज-प्रतिनिधी अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती.केज शहरातील स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग व विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले.निरोप समारंभाचे आयोजन इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका चाटे बी.बी.यांच्या नियोजनानुसार शिक्षकांच्या मदतीने केले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी दयानंद प्रतिष्ठान केजचे सहसचिव तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अशोकराव डांगे तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.यादव व्ही. बी.यांची उपस्थिती होती. प्रारंभी…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने सायकलींचे वाटप होणार गौतम बचुटे/केज – केज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवाचे औचित्य साधून शिक्षणासाठी पायपीट कराव्या लागत असलेल्या गरजवंत विद्यार्थ्यांना दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक दिपक भाऊ कांबळे युवा मंचचे संस्थापक रंजित कांबळे आहेत. या बाबतची माहिती अशी की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्व वंदनीय भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलीत आणि वंचित समाजाला सांगितले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ती जे प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असा मूलमंत्र दिला. तसेच शिका संघटित व्हा आणि संघर्ष…

Read More

सतत विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण ; दहा एमव्हीए चा ट्रान्सफॉर्मर बसवला तरीही परिस्थिती जैसे थे केज- केज शहरात मागील काही दिवसांत तासनतास सतत विजेचा लपंडाव चालू असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. कोणतीही पुर्वसुचना न देता दिवसा व रात्री विज पुरवठा खंडित होत आहे. विज वितरण कार्यालयात संपर्क केला असता फोन लागत नाही त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी असा यक्षप्रश्न निर्माण होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी दहा एमव्हीए क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवला असून आतातरी विज पुरवठा अखंडीतपणे चालू राहील अशी अपेक्षा होती, परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थेच असल्याने सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक…

Read More

रामनवमी निमित्ताने सामान्यज्ञान व चित्रकला स्पर्धा संपन्न केज- रामनवमी निमित्ताने कानडी रोड येथील हनुमान मंदीर (वकीलवाडी) येथे सामान्यज्ञान व चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आला होते. या स्पर्धेत लहान मुला मुलींना मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. स्पर्धा संपल्यानंतर रामनवमी निमित्ताने महाप्रसादाचा लाभही परिसरातील भाविकांनी घेतला. लहान विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन हा स्तुत्य उपक्रम राबवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवाशिष रमेशराव आडसकर, गायकवाड, राऊत,कदम व सर्व मित्र परिवारने परिश्रम घेतले.

Read More

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या क्रूर घटनेतील आरोपींना फाशी व्हायला हवी — गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम या पुढे गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही गौतम बचुटे/केज संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्दतीने हत्या करण्यात आली. त्या सर्व मारेकऱ्यांना कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हायला हवी असे माझे वैक्तीक मत असून जर या हत्या प्रकरणातील कोणत्याही कैद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असेल तर ते गैर असून त्याची सुद्धा चौकशी केली जाईल तसेच या सर्व प्रकरणाकडे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे या सर्व प्रकरणात कडे लक्ष ठेवून आहेत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे त्यांच्या पूर्वीच्या गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी असताना त्यांची पोलीस…

Read More