Author: विजयराज आरकडे

केजच्या बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे प्रा.सुरेश कांबळे यांना ‘पीएच.डी.’ प्रदान ​ केज- प्रतिनिधी केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुरेश अर्जुनराव कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च मानली जाणारी ‘पीएच.डी.’ (Ph.D.) पदवी बहाल केली आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ​संशोधनाचा विषय आणि मार्गदर्शन ​डॉ. सुरेश कांबळे यांनी रसायनशास्त्र विषयात “फार्माकोलॉजिकल स्टडी ऑफ सम हेटरो सायकलीक कंपाउंड विथ स्पेशल रेफरन्स टू सोल्युट – सॉलवंट इंट्रॅक्शन्स” (Pharmacological Study of Some Heterocyclic Compounds with Special Reference to Solute-Solvent Interactions) या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. ​हे संशोधन…

Read More

केजमध्ये बुलढाणा अर्बन बँक बंद होणार असल्याच्या अफवेने खळबळ; खातेदारांची मोठी गर्दी केज (दि. ३० डिसेंबर): बुलढाणा अर्बन बँक बंद होणार असल्याची अफवा शहरात पसरल्याने केज येथील बँक शाखेत आज खातेदारांची मोठी गर्दी उसळली. अचानक पसरलेल्या या अफवेमुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी आपले पैसे व सोने सुरक्षिततेच्या दृष्टीने काढून घेण्यासाठी बँकेत धाव घेतली आहे. बुलढाणा अर्बन बँक गोल्ड लोन सुविधा देत असल्याने अनेक खातेदारांनी आपले सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. बँक बंद होणार या चर्चेमुळे सोने सोडवून घेण्यासाठी पैसे भरावे लागणार असल्याची चिंता अनेक ठेवीदारांना सतावत आहे. सध्या हाताशी पैसे नसल्याने अनेक नागरिक तणावात असल्याचे चित्र…

Read More

केजच्या न्यायालयातील सर्वपरिचित व्यक्तिमत्व पडद्याआड! जेष्ठ विधिज्ञ जनार्धनराव अदमाणे यांचे निधन…..!! केज : येथील प्रसिद्ध वकील ऍड जनार्धनराव आदमाने यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने बीड येथे निधन झाले. केजच्या न्यायालयालासतत ‘व्हायब्रेट’ ठेवून चैतन्य निर्माण करणारे जेष्ठ विधिज्ञ जनार्धनराव आदमाने यांचे केजच्या वकिली व्यवसायात अत्यंत आदराचे स्थान होते. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. वकिली व्यवसायात राहून इंग्रजी विषयावरील त्यांचे प्रभुत्व व संवाद कौशल्याने त्यांनी इतरांवर मोठी छाप टाकली होती. केज येथून इंडियन एक्सप्रेस सारख्या राष्ट्रीय दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या या ज्ञान व संवाद कौशल्याचा अनेकांना हेवा वाटायचा. अवघड व कठीण वाटणारे इंग्रजी भाषेतील मसुद्यांचा मराठी…

Read More

नांदेड मध्ये राज्याचा गौरव ! राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेत शिवम मोराळे याने मिळविले ब्राँझ पदक केज (प्रतिनिधी): नांदेड येथे झालेल्या १२ व्या नॅशनल ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप २०२५-२६ या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रगती विद्यालय, बीड येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या चि. शिवम अमोल मोराळे याने उल्लेखनीय कामगिरी करत ब्राँझ पदक मिळवून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील २५ राज्यांचे संघ सहभागी झाले होते. तीव्र स्पर्धेतही शिवम ने दमदार प्रदर्शन करत आपल्या क्रीडा क्षमतेची चमक दाखवली. शिवमच्या या उज्वल यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाची दाद मिळत असून त्याच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. तो केज तालुक्यातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उद्धवराव मोराळे यांचा नातू…

Read More

शिवशंभु युवा प्रतिष्ठान व जनविकास फाउंडेशनतर्फे केजमध्ये भव्य शारदीय नवरात्र महोत्सव – स्वर्णगिरी मंदिर देखावा आकर्षणाचे केंद्रबिंदू केज (प्रतिनिधी) – शिवशंभु युवा प्रतिष्ठान, समर्थनगर व जनविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केज शहरात यंदा प्रथमच शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त स्वर्णगिरी मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला असून, तो शहरातील नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. समर्थनगर येथे उभारण्यात आलेल्या या देखाव्याला महिला, लहान मुले व तरुण वर्ग मोठ्या संख्येने भेट देत आहेत. धार्मिक वातावरण, पारंपरिक सजावट व भक्तिभावाने भारलेली संध्याकाळ या देखाव्याच्या ठिकाणी अनुभवता येत आहे. महोत्सवात दररोज महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्या टिपरी नृत्य, भक्तीगीत, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून…

Read More

वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आपत्ती ग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत करणार- रमेशराव आडसकर केज- केज शहरातील वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या प्रसंगी व्यासपीठावर मा. रमेशराव आडसकर, रणजीतभैया आडसकर, प्राचार्य श्री. फावडे, चेअरमन श्री. सुरेश शिनगारे, सचिव श्री. बालासाहेब घुगे व संचालक मंडळ उपस्थित होते. सभेची सुरुवात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली व सरस्वती पूजनाने झाली. संस्थेचे प्रेरणास्थान बाबुरावजी आडसकर यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. सध्याच्या अवर्षण व निसर्ग संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पाहुणे मा. रमेशराव आडसकर यांच्या सूचनेनुसार कोणताही औपचारिक स्वागत सोहळा न घेता…

Read More

केज येथील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेस खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद खेळांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो—डॉ हनुमंत सौदागर केज- शहरालगत असलेल्या माऊली विद्यापीठ संचलित भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाच्या मैदानावर तालुकास्तरीय दोन दिवसीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग आणि केज तालुका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाचे डॉ हनुमंत सौदागर हे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ हनुमंत सौदागर म्हणाले खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि सराव याचा वापर केल्यास यश निश्चित मिळते असे मत व्यक्त केले. विजेत्या संघाचे अभिनंदन करून…

Read More