Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

दलित चळवळतील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा व स्नेह भोजनाचे आयोजन;

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 9, 2025No Comments2 Mins Read

दलित चळवळतील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा व स्नेह भोजनाचे आयोजन;

केज/प्रतिनिधी
दलित चळवळतील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा व स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन हे बुधवार दिनांक १० डिसेंबर रोजी करण्यात आले होते परंतु काही “पॅंथर”ज्येष्ठ कार्यकर्ते हे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई व नागपूर येथे गेलेले आहेत. ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाहीत म्हणून हा कार्यक्रम रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी केज शहरातील महात्मा फुले नगर भागातील जे.के.फंक्शन हॉल येथे संपन्न होणार आहे. तरी केज शहरासह तालुक्यातील दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लखन हजारे शरद धीवार, अशोक गायकवाड यांनी केले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज तालुक्यातील व शहरातील अनेक पॅंथर,दलित चळवळतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चळवळीसाठी मोठे योगदान दिलेले आहे. सध्या दलित चळवळीमध्ये युवक-तरुण कार्यकर्त्यांची फळी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु पूर्वी पॅंथर म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ कार्यकर्ते यांच्या कार्याला उजळा मिळावा व त्यांच्या कार्याची तरुण कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळावी व त्यांची प्रेरणा घेऊन चळवळ पुढे नेण्याचे काम करावे, दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मोठा संघर्ष उभारून स्वतःचे आयुष्य हे समाजासाठी झिजवून चळवळ पुढे नेण्याचे काम केलेले आहे म्हणून जेष्ठ कार्यकर्त्याचा सन्मान होणे गरजेचे आहे.या संकल्पनेतून लखन हजारे, अशोक गायकवाड, शरद धीवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी १२-०० वाजता शहरातील महात्मा फुले नगर भागातील जे.के.फंक्शन हॉल येथे केज शहरासह तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा व स्नेह मोजण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी केज शहरासह तालुक्यातील दलित चळवळतील जेष्ठ कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक लखन हजारे, अशोक गायकवाड,शरद धीवार यांनी केले आहे.
माध्यमांशी बोलताना आयोजकांनी सांगितले की, दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा व स्नेहभोजनाचे आयोजन हे बुधवार रोजी केले होते परंतु काही ज्येष्ठ कार्यकर्ते हे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई व नागपूर येथे गेलेले होते ते सध्या त्यांच्या नातेवाईकाकडे आहेत असे काही जेष्ठ कार्यकर्त्यांनी आयोजकांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली व त्यांनी सांगितले की,आम्ही बुधवार रोजी होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाहीत म्हणून हा कार्यक्रम बुधवार ऐवजी रविवारी करण्याचे नियोजित केले आहे. पुढे बोलताना आयोजक म्हणाले की, हा कार्यक्रम भीम नगर, महात्मा फुले नगर, क्रांतीनगर या शहरातील विविध ठिकाणी राहणाऱ्या सर्व युवकांच्या व चळवळीतील युवा कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून संपन्न होणार आहे अशी माहिती दिली.
विजयराज आरकडे

Post Views: 105
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 9
Total Users : 147129
Views Today : 6

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.