स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंचा आज 428वा जन्मोत्सव सोहळा व राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा
१२ जानेवारी २०२६ : बुवासाहेब पाटील माध्य. व उच्च माध्य.विद्यालय, शिंदी येथे ” राजमाता जिजाऊ यांचा ४२८ वा जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती – युवा दिन” दोन्ही संयुक्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आले. या विशेष प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य सदाशिव मुंडे होते . त्यांनी युवकाना प्रेरणा व जिजाऊंचा आदर्श देऊन प्रोत्साहन दिले तसेच जिजाऊ माँ साहेब यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. प्रा . शब्बीर शेख , प्रा . सुशिल राऊत ,प्रा . रामेश्वर चटप ,
प्रा . शिरीष भाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच सिताराम चौरे , प्रा. बाबासाहेब काळे ,अशोक वाघमोडे, प्रकाश जोगदंड ,विनायक घोळवे, हरिभाऊ कांबळे यांनी सखोल व्याख्यान दिले. त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरक विचारांची आजच्या काळातील महत्त्वपूर्ण आवश्यकता स्पष्ट केली.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ व विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून झाली. प्रमुख पाहुणे जाधव सर , रामेश्वर हांगे यांनी कार्यक्रमाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता दहावी ची विद्यार्थीनी कु आपेक्षा मनसुके हिने केले. तसेच सुत्र संचालन कु . ऋतुजा जाधव हिने केले तर आभार प्रदर्शन प्राची पोपळे हिने केले. याप्रसंगी , मंचावर माता जिजाऊ च्या वेषभूषा केलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.
