Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

ई बसडेपो व इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटरला मंजुरी दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार केज विकास संघर्ष समितीच्या प्रदीर्घ लढ्याला यश!

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJanuary 10, 2026No Comments2 Mins Read

ई बसडेपो व इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटरला मंजुरी दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार

केज विकास संघर्ष समितीच्या प्रदीर्घ लढ्याला यश!

केज : केजला बसडेपो सुरु करावा या मागणीसाठी गेली अनेक वर्षे केज विकास संघर्ष समिती शासनाकडे विविध आंदोलने व निवेदनाच्या रूपाने पाठपुरावा करत होती. यासाठी समितीने दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री ना प्रताप सरनाईक यांची मुंबई येथे भेट घेऊन पाठपुरावा केला होता. मंत्रिमहोदयानी संबंधित विभागाला तात्काळ कार्यवाहीचे आदेशही दिले होते. केज भेटीमध्ये मा मंत्रिमहोदयाची गाडी आरक्षित बसडेपो जागेजवळ थांबवून त्यांना तातडीची कार्यवाही करण्याची विनंती केली होती. अलीकडील काळात केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नाचीही या कामी मोठी साथ मिळाली आहे.
आता केज शहरासाठी ई बसडेपो मंजुरीमुळे केजच्या प्रवाशांना मोठा फायदा होईल तसेच केजच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. लांब पल्याच्या बसगाड्या तसेच इमर्जन्सी बससेवा केज येथून उपलब्ध करणे शक्य होणार आहे. कोणत्याही समस्यांचा पाठपुरावा करून त्या शासन व समाज दरबारी मांडण्यासाठी सामाजिक संघटना आवाज उठवत असतात, त्या सोडवण्याचे काम प्रशासन व जबाबदार लोकप्रतिधीचेच असते. केज विकास संघर्ष समितीने गेली अनेक वर्षे या मागणीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री तसेच स्थानिक आमदार यांचे केज विकास संघर्ष समिती ने आभार व्यक्त केले आहेत. सध्या केज शहर अंतर्गत महामार्गवरील वाहतूक कोंडी व अपघात तातडीची मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे यापुढे केजची महत्वाची समस्या रिंगरोड (बायपास) किंवा उड्डाणपूल यापैकी केजवासियांना सोयीचे व फायद्याचे होईल तो पर्यायी रस्ता केज शहराला उपलब्ध करून देण्यासाठी समिती आपला लढा सूरु ठेवणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार बजरंग बप्पा सोनवणे व आमदार नमिताताई मुंदडा यांनी विशेषलक्ष घालून सहकार्य करावे अशी मागणी समितीच्या वतीने समन्वयक हनुमंत भोसले, नासेर मुंडे, शेषराव घोरपडे इंजिनिअर मोहनराव कराड,संपत वाघमारे, महेश जाजू यांनी केली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 75
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 3
Total Users : 149383
Views Today : 11

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.