Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ कोटी ६२ लाख रुपयांचा घरकुल घोटाळा हा आमच्या कार्यकाळातील नाही, सिध्द करणार्यास १ लाखाचे बक्षीस– हारुणभाई इनामदार घरकुल अपहार प्रकरणातील संबंधित दोषीवर शासनाने योग्य ती कारवाई करावी – नगराध्यक्षा सिताताई बनसोड न.प. सत्ताधारी नेत्यांनी हात झटकले; मग घरकुल लाभार्थ्यांचा निधी पळवला कोणी?

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेFebruary 1, 2026No Comments6 Mins Read

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ कोटी ६२ लाख रुपयांचा घरकुल घोटाळा हा आमच्या कार्यकाळातील नाही, सिध्द करणार्यास १ लाखाचे बक्षीस–

हारुणभाई इनामदार

घरकुल अपहार प्रकरणातील संबंधित दोषीवर शासनाने योग्य ती कारवाई करावी –
नगराध्यक्षा सिताताई बनसोड

न.प. सत्ताधारी नेत्यांनी हात झटकले; मग घरकुल लाभार्थ्यांचा निधी पळवला कोणी?

केज/प्रतिनिधी

३ कोटी ६२ लाख रुपयांचा घरकुल घोटाळा हा आमच्या कार्यकाळातील नसून तत्कालीन प्रशासनातील प्रशासक,
अधिकारी व त्यावेळीच्या संबंधित लोकांनी केलेला आहे. अशी माहिती हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. तर घरकुल अपहार प्रकरणातील संबंधित दोषीवर शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पत्रकार परिषद द्वारे हारुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी केली आहे.

विद्यमान न. प. सत्ताधारी यांनी या भ्रष्टाचारातून हात झटकले आहेत मात्र पंतप्रधान आवास योजनेचा मंजूर लाभार्थी यांचा निधी पळवला कोणी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की. दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी केज येथील शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत हारुणभाई इनामदार यांनी सांगितले की, दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी दैनिक सकाळ या वर्तमानपत्रात एक बातमी प्रकाशित झाली ती म्हणजे केज नगरपंचायत च्या घरकुलाच्या अपहरा बाबतची एक बातमी प्रकाशित झालेली आहे. परंतु त्या बातमीमध्ये सन २०१९ ते २०२३ असा कालावधीचा थोडा आवमेळ दिसून आलेला आहे. परंतु आमच्या कार्यकाळास दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून सुरुवात झालेली आहे. सदरील घरकुलांचा अपहार हा दिनांक २० मे २०१९ ते दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ च्या अगोदरच झालेला आहे.त्यामुळे सदर झालेल्या घरकुल अपराचा आमचा काडीमात्र संबंध नाही असे ठाम पणे गटनेते हारूणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी बोलताना स्पष्ट केले.
तर केज नगरपंचायतला सन २०१९ ला डीपीआर क्र.१,३७४ घरकुलाचा डीपीआर मंजूर झाला.
आणि तो डीपीआर मंजूर झाल्यानंतर केंद्र शासनाकडून ४ कोटी १९ लाख ३५ हजार ४१३ रुपये तर महाराष्ट्र शासनाकडून १७ लाख १५ हजार ७०४ रुपये एवढा निधी केज नगरपंचायत ला प्राप्त झाला. हा कालावधी सन २०१९ ला सदरचा निधी हा प्राप्त झालेला होता. आज रोजी घेण्यात आलेली पत्रकार परिषदे ही कोणत्या राजकीय हेतूने प्रेरित होऊन घेण्यात आलेली नाही.
फक्त आम्ही जे लोकांना डिक्लेअर केलेले आमचे उद्दिष्ट आहे व आम्ही लोकांना दिलेला विश्वास आहे तो विश्वास आम्हाला टिकवायचा आहे. आमच्या भोळ्या-भाबड्या जनतेला केज नगरपंचायतने घरकुलाचा घोटाळा केला आहे. आशयाच्या बातम्या प्रकाशित झाल्या व तशा बातम्या लागलेल्या आहेत आणि अशा बातम्या येणे गरजेचे आहे. जे काही चुकीचे आहे ते लोकांच्या समोर येणे गरजेचे आहे व ते लोकांना माहीत झाले पाहिजे. जे काही चुकीचे असेल ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, लोकांना प्रश्न कळणे गरजेचे आहे. केजच्या ज्या लोकांनी आम्हाला मोठ्या विश्वासाने केज नगरपंचायत च्या ठिकाणी सेवक म्हणून बसवले आहे. आमच्या कार्यकाळामध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार हा सिद्ध झाला तर आम्ही त्या बदल्यात आमचा भ्रष्टाचार सिद्ध करणाऱ्याला व्यक्तीला १ लाख १ हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केलेले आहे. त्यामुळे आमच्या प्रतिमेला कुठेही गालबोट लागू नये आणि लोकांचा समज-गैरसमज होऊ नये म्हणून लोकांसमोर खरे व सत्य परिस्थिती मांडण्यासाठी आम्ही आज रोजीची पत्रकार परिषद घेतली आहे.
सन २०१९ च्या डीपीआर नुसार ३७४ घरकुल मंजूर झालेली आहेत व निधी देखील प्राप्त झाला होता.परंतु त्यापैकी १३३ लाभार्थ्यांना पहिला, दुसरा, तिसरा हप्ता देण्यात आला. लाभार्थ्यांना वरील रक्कम ही इतर रकमेतून त्यांच्या घरकुलांचे हप्ते हे आमच्या कार्यकाळात देण्यात आले.
परंतु त्यामध्ये तत्कालीन प्रशासनातील काम करणारे प्रशासक व त्या कालावधीतील कार्यरत असलेले अधिकारी आणि त्याचबरोबर संबंधित लोकांनी संगणमत करून घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे न टाकता जवळपास ३ कोटी ६२ लाख रुपये एवढा निधी हा नियमबाह्य पद्धतीने चुकीच्या मार्गाने लाभार्थ्यांच्या खात्यावर न टाकता, विविध एजन्सीच्या व ज्या ज्या एजन्सी त्यांच्या संबंधित आहेत अशा एजन्सी सामील होत्या या सर्व एजन्सीच्या नावाने डायरेक्ट धनादेश देऊन अनियमित व कायद्यात बसत नसताना ते नियमबाह्य असताना देखील अशा पद्धतीचे काम त्यावेळीचे प्रशासनात काम करणारे तत्कालीन प्रशासक व त्यावेळी चे अधिकारी आणि त्यावेळीचे संबंधित लोकांनी संगणमत करून ३ कोटी ६२ लाख रुपयाचा निधी हा लाभार्थ्यांच्या नावे खात्यावर जमा न करता व त्यांना सदरची रक्कम न देताच संबंधित एजन्सीच्या नावाने धनादेश काढून ३ कोटी ६२ लाख रुपयांचा अपहार केलेला आहे.
सदर घरकुलाचा अपहाराचा कालावधी हा शासनाच्या अहवालात म्हणजेच मुख्य अधिकारी, लेखापाल श्री. महारुद्र वडकर यांच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
जो कालावधी दिनांक २० मे २०१९ ते दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत प्राथमिक दृष्ट्या घरकुल लाभार्थ्यांना लाभ न देताच इतरत्र कामासाठी सदरचा निधी हा आदा केल्याचे दिसून येत आहे असे शासनाच्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
त्यासंबंधी सर्व पुरावे हे सदर अहवालात जोडलेले आहेत तसेच सदर अहवालामध्ये ज्या लाभार्थी यांना पैसे दिले आहेत अशा लाभार्थ्यांची नावे आहेत त्याचबरोबर ज्या एजन्सी व इतरांना पैसे दिलेले आहेत अशा सर्वांची नावे सदर अहवालात नमूद करण्यात आलेली आहेत.
तसेच ज्या ज्या एजन्सीच्या नावाने पैसे दिले गेलेले आहेत अशांची देखील नावे आहेत, ज्या बँकेच्या खात्यावरून सदरचे व्यवहार करण्यात आलेले आहेत त्यांचे देखील बँक स्टेटमेंट जोडून शासनाकडे अहवाल तसा सादर केलेला आहे. सदरचा अहवाल हा आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवला आहे. शासनाकडे आमची मागणी आहे की, ज्या ज्या लोकांनी घरकुलाच्या संबंधाने अपहर केला आहे त्याचबरोबर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. संबंधित दोषींना पावबंद बसला पाहिजे, घरकुलच्या लाभार्थ्यांसाठी आलेल्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधित दोषीवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. सदरचा प्रकार हा लोकांच्या समोर आला पाहिजे व लोकांना न्याय मिळाला पाहिजे. ही आमची भूमिका असून तशी आमची मागणी आहे. आम्ही सन २०२२ ची केज नगरपंचायत ची निवडणूक ही लढविली व दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी केज नगरपंचायत चा चार्ज आम्ही घेतला, सदरचा चार्ज घेण्याअगोदर पंधरा दिवसांपूर्वी सदर घरकुलाचा अपहार झालेला आहे. आम्ही चार्ज घेते वेळी चार्ज पट्टी चेक करून घेतली असता त्यावेळी नगरपंचायत च्या खात्यावर फक्त ५० हजार रुपये एवढी रक्कम शिल्लक होती.
त्या ५० हजार रुपये रकमेवर आज रोजी ४ वर्षाचा नगरपंचायतचा कारभार हा एक सक्षम, सुशिक्षित महिला नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेऊन जनतेची सेवा करत आहोत. आमच्या भोळ्या-भाबड्या नागरिकांनी खोट्या-नाट्य माहितीला बळी पडू नये, आमच्या गोरगरीब जनतेची कोणीही दिशाभूल करू नये, जनतेने आम्हाला सेवक म्हणून केज नगरपंचायत ला काम करण्याची संधी दिली आहे. आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करू, लोकांच्या विश्वासाला कदापी तडा जावू देणार नाहीत ‌ आम्ही आजपर्यंतच्या कामात कुठेही भ्रष्टाचार केलेला नाही व यापुढेही भ्रष्टाचार करणार नाहीत. मात्र संबंधित दोषीवर शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गटनेते हारूणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. व घरकुला झालेल्या अपहाराचा खुलासा त्यांनी केला आहे.
———————————

केज वासियांनी आम्हाला सेवक म्हणून केजच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी संधी दिली आहे व आमच्यावर नागरिकांनी मोठा असा विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाहीत. आम्ही सतत जनसेवक म्हणून मागील चार वर्षापासून काम करत आलो आहोत. यापुढेही जनतेचे जनसेवक म्हणूनच काम करत राहू. सदरचा अपहार हा आमच्या कार्यकाळात झालेला नाही आमच्या कार्यकाळाच्या अगोदर पंधरा दिवसांपूर्वी झालेला आहे.त्याचा व आमचा कुठेही काही संबंध नाही. सदर प्रकरणाचे आम्ही समर्थन करणार नाहीत व आतापर्यंत करत आलेलो नाहीत. या अपहारामुळे काही घरकुल लाभार्थ्यांचे पैसे शासनाने थांबवले आहेत. आम्ही शासन स्तरावर तात्काळ पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यासाठी तत्पर आहोत.केज शहराच्या विकासासाठी आम्ही कायम तत्पर आहोत. आम्ही जनतेच्या व आमच्या वरिष्ठांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाहीत.ज्या घरकुल लाभार्थ्यांना व नागरिकांना काही अडचण आल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.
*नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड व गटनेते हारुणभाई इनामदार*

विजयराज आरकडे

Post Views: 118
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 2 7
Total Users : 147127
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.