Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केजच्या न्यायालयातील सर्वपरिचित व्यक्तिमत्व पडद्याआड! जेष्ठ विधिज्ञ जनार्धनराव अदमाणे यांचे निधन…..!!

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 24, 2025No Comments2 Mins Read

केजच्या न्यायालयातील सर्वपरिचित व्यक्तिमत्व पडद्याआड!

जेष्ठ विधिज्ञ जनार्धनराव अदमाणे यांचे निधन…..!!

केज : येथील प्रसिद्ध वकील ऍड जनार्धनराव आदमाने यांचे बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने बीड येथे निधन झाले.
केजच्या न्यायालयालासतत ‘व्हायब्रेट’ ठेवून चैतन्य निर्माण करणारे जेष्ठ विधिज्ञ जनार्धनराव आदमाने यांचे केजच्या वकिली व्यवसायात अत्यंत आदराचे स्थान होते. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला. वकिली व्यवसायात राहून इंग्रजी विषयावरील त्यांचे प्रभुत्व व संवाद कौशल्याने त्यांनी इतरांवर मोठी छाप टाकली होती. केज येथून इंडियन एक्सप्रेस सारख्या राष्ट्रीय दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या या ज्ञान व संवाद कौशल्याचा अनेकांना हेवा वाटायचा. अवघड व कठीण वाटणारे इंग्रजी भाषेतील मसुद्यांचा मराठी भाषेत अनुवादीत करण्यासाठी अनेक लोक त्यांचे मार्गदर्शन घेत असत.
त्यांच्या अवांतर ज्ञानाचा आवाकाही खूप मोठा होता. खुप सामान्य व साधेपणाचे जीवन जगताना त्यांचा पेहराव अत्यंत टापटीपीचा व शिस्तबद्ध असायचा. वयाच्या सत्तरीनंतर कडाक्याच्या थंडीतही त्यांचं धावणे व व्यायाम सुरूच होता. सकाळी पहाटे चार वाजता उठून त्यांच्या संपर्कातील लोकांना ते दरवाजावर हाक देऊन जागे करायचे.
त्यांचे जीवन नवीन पिढीला प्रेरणादायी होते. ते धारूर तालुक्यातील अंजनडोह येथील मूळ निवासी होते. बुधवार दि 24 डिसेंबर 25 रोजी सकाळी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन विवाहित मुली आहेत. सध्या ते बीड येथे मुलीकडेच राहत होते. त्यांच्या सर्वच मुलींनी त्यांची अखेरपर्यंत खुप सेवा करून त्यांना मुलगा नसल्याची उणीव कधीच भासू दिली नाही.
त्यांच्यावर बुधवारी सकाळी ठीक 11 वाजता बीड येथील संत भगवान बाबा स्मशानभूमीत येथे अंतिम संस्कार पार पडले. यावेळी नातेवाईकांसह, इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
केज न्यायालय, रोटरी क्लब ऑफ केज, सर्व सामाजिक संस्था व केजवासियांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विजयराज आरकडे

Post Views: 84
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 8 9
Total Users : 149389
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.