Author: विजयराज आरकडे

*सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल सेवा गौरव पुरस्कार घोषित* गौतम बचुटे/केज : – पोलीस सेवेत कार्यरत असतानाही सामाजिक बांधिलकी जपणारे बीड जिल्ह्यातील केज येथून संभाजीनगर जिल्ह्यातील वीरगाव पोलीस ठाण्यात बदली झालेले प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर वाघमोडे यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. केज येथील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले शंकर वाघमोडे यांनी केज येथे सेवा करीत असताना पोलीस खात्यातील कामा सोबतच सामाजिक कार्यातही स्वतःला झोकून दिले. त्यांनी दिवाळी आणि ईत्तर सणाच्या निमित्ताने केलेली फराळ वाटप असो. दिव्यांग आणि…

Read More

कै.अप्पासाहे देशमुख बहुद्देशीय सेवा भावी संस्था आयोजित रोड सस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मालक,चालक यांची मोफत आरोग्य तपासणी सपन्न केज- वाढत असलेल्या अपघात पाहता कै.अप्पासाहेब देशमुख बहुद्देशीय सेवा भावी संस्थाच्या वतीने जिल्ह्यातील वाहन मालक,चालक,वाहक यांची मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आली होते या शिबीरात 93 मालक, चालक,वाहक,यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. रोड सेफ्टीसाठी रस्ता सुरक्षा अभियान या योजना अंतर्गत जिल्ह्यातील छोटे,व मोठे वाहण मालक,चालक,वाहक हे लोकांना पळापळीच्या जीवनात आरोग्यकडे दुर्लक्ष करतात यामुळे विविध आजाराची लागन होऊन वाहन चालत असताना आनेकांना हृदय विकार झटका,बेशुद्ध होणे असे आनेक आजारामुळे अपघात घडतात हे लक्षात घेत कै.अप्पासाहेब देशमुख बहुद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने आज…

Read More

*कोण आहेत नवनीत कॉवत* *कशी आहे त्यांची कारकीर्द* नवनीत कॉवत हे २०१७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अतिशय कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण झालेल्या नवनीत कॉवत यांनी आयआयटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे नवनीत कॉवत हे तीन वेळेस युपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. नवनीत कॉवत सुरुवातीला ते आयईएस, नंतर आयआरएस आणि त्यानंतर आयपीएस झाले आहेत. सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते.

Read More

नवनवीन कॉवत बीडचे नवीन पोलीस अधीक्षक बीड- बीड पोलीस दलाला व जिल्ह्याला नवनीत कॉवत हे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. बीड व केज पोलीसांच्या भुमेकेबद्दल संशय निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर अविनाश बारगळ भा. पो. से. यांची बदली करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले होते. त्याची अंमलबजावणी करून बीड ला आता नवनीत कॉवत हे एस. पी. म्हणून रुजू होणार आहेत. ते छत्रपती संभाजी नगर येथे पोलीस उप आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ उबाठा शिवसेना पक्षाच्या वतीने केज येथे निदर्शने केज- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना नेते आमदार सुनीलजी प्रभु साहेब मराठवाडा समन्वयक उपनेते विश्वनाथ नेरूरकर साहेब उपनेत्या सुषमाताई अंधारे बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव साहेब लोकसभा प्रमुख माजी आमदार सुनीलजी धांडे सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या उपस्थितीत केज येथे तालुका प्रमुख अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील…

Read More

स्व. विमलताई यांनी केजला नगरपंचायत दर्जा मिळवून दिला होता आता त्यांच्या सुन आ. नमिताताई मुंदडा नगरपालिकेचा दर्जा मिळवून देणार आ. नमिता मुंदडा यांची विधिमंडळात मागणी केज / प्रतिनिधी :- शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अस्तित्वात असलेली नगरपंचायत नागरिकांना सुविधा देण्यात कमी पडत आहे विकासाचे प्रश्न मिळणाऱ्या तोकड्या निधीमुळे प्रलंबित आहेत म्हणून केजला नगरपालिकेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आ नमिता मुंदडा यांनी विधिमंडळात केली आहे 2009 साली केजच्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले त्यावेळी केजच्या विकासाला चालना मिळेल असा अंदाज होता परंतु तसे होत नसल्यामुळे शहराच्या विकासाची अनेक प्रश्न प्रलंबित राहिली आहेत त्यातच आता शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे त्यामुळे…

Read More

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन; देशमुख हत्या व परभणीतील येथील दोषींवर कठोर कारवाई करावाईची मागणी; बीड (प्रतिनिधी) केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करावे तसेच परभणी येथील आंदोलनकर्ते व संविधानरक्षक ॲड. सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेत दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ बिग्रेडच्या वतीने पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बीड येथे मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ बिग्रेडच्या वतीने पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा जाहिर निषेध करण्यात येत आहे.तसेच परभणी येथील पोलीस…

Read More

आता संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जाणार लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि बँकेचे पास बुक व मोबाईल क्रमांक तलाठ्याकडे द्यावेत अन्यथा अनुदान बंद होईल — तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आवाहन गौतम बचुटे/केज – केज तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड, बँकेचे पास बुक व मोबाईल नंबर हे त्यांच्या तलाठ्याकडे जमा करण्याचे आवाहन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले आहे. तसेच सदर कागद पत्रे वेळेत सादर न केल्यास अनुदान बंद होणार असल्याचा इशारा देखील दिला आहे. या बाबतची माहिती अशी…

Read More

केज तहसीलवर सर्व दलित संघटनांचा आक्रोश मोर्चा सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना व त्यांना मदत करणाऱ्यांना कठोर शासन करा गौतम बचुटे/केज :- परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या खुनातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याशी संबंधित सर्व गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे. यासाठी केज येथे सर्व दलित संघटनांनी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. या बाबतची माहिती अशी की, परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या जमावर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. त्यात कायद्याचे शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच केज तालुक्यातील…

Read More

Briliyance Proactive Abacus class चे घवघवीत यश केज- 9.12.2024 रोजी बीड येथे झालेल्या नॅशनल Abacus Competition  विभागीय पातळी वरील Abacus स्पर्धेत केज येथील Briliyance Proactive Abacus class चे घवघवीत यश. सदर स्पर्धेत क्लासचे 25 विद्यार्थी बसले होते, पैकी दुर्वा दिलीपराव अंधारे व दक्ष विजया काळे यांनी प्रथम पारितोषिक मिळवले तर  कृष्णा  दत्ता अंधारे, अली खमर कुरेशी, विराट विरेंद्र जोगदंड, श्रेयस अमोल पालवदे यांनी 4 थे तर उर्वरित 19 जणांनी 6 वे व 7 वे स्थान मिळवले व मेडल प्राप्त केले. तसेच  केंद्र चालक दिलीप अंधारे व चालीका वनिता अंधारे यांना बेस्ट सेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्वाचे सर्व स्तरातून…

Read More