केज पोलीसांनी रस्त्यावर उभी केलेली वाहने आणि अडथळे हटविले
गौतम बचुटे/केज :-
बीड येथे नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक नवनीत कॉवंत यांनी जिल्ह्यातील अवैध्य धंदे आणि गुन्हेगारी रोखण्यावर पहिल्या दिवसा पासून सुरुवात केली आहे. तर केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील यांनी रस्त्यावर उतरून केज येथून जाणाऱ्या अंबाजोगाई-मांजरसुंबा-जामखेड महामार्ग क्र. ५४८-डी आणि खामगाव-सांगोला महामार्ग क्र. ५४८-सी वरील बसस्टँड परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, कळंब रोड, केजवर बेशिस्तपणे उभी केलेले वाहने व दुकानदारांनी ठेवलेल्या पाट्या व बोर्ड तसेच हातगाडे हटविली आहेत.
पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरत रस्ता अडथळा मुक्त करण्याचे दिला. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस हेडकॉन्स्टेबल बालासाहेब बांगर, वाहतूक शाखेचे नितीन जाधव, गोरख फड, शहादे मेहेत्रे, शिवाजी कागदे, शंभुदेव दराडे आणि केज पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हजर होते.
,