Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल सेवा गौरव पुरस्कार घोषित*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 24, 2024No Comments2 Mins Read

*सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल सेवा गौरव पुरस्कार घोषित*

 

गौतम बचुटे/केज :

– पोलीस सेवेत कार्यरत असतानाही सामाजिक बांधिलकी जपणारे बीड जिल्ह्यातील केज येथून संभाजीनगर जिल्ह्यातील वीरगाव पोलीस ठाण्यात बदली झालेले प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शंकर वाघमोडे यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून लवकरच एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
केज येथील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले शंकर वाघमोडे यांनी केज येथे सेवा करीत असताना पोलीस खात्यातील कामा सोबतच सामाजिक कार्यातही स्वतःला झोकून दिले. त्यांनी दिवाळी आणि ईत्तर सणाच्या निमित्ताने केलेली फराळ वाटप असो. दिव्यांग आणि असहाय्य व्यतीना केलेली मदत असेल. तसेच अपघातात वेळोवेळी स्वतः धावून जात जखमिंचेचे प्राण वाचविण्यासाठी तात्काळ मदत करून त्याला वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध करून देणे असेल. तसेच गुन्हेगारांवर निर्माण केलेला धाक आणि त्यांना कायद्याची जरब बसावी म्हणून केलेल्या एम पी डी ए आणि हद्दपारी सारख्या कठोर कारवाया असोत. पोलीस आणि सामान्य नागरिक यांच्यातील सबंध आणि जनतेशी सुसंवाद तसेच गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगल्या पद्धतीने केले आहे. पोलीसा बद्दल सामान्य नागरिकांत विश्वास दृढ केला. गुन्हेगारी कमी करून गुन्ह्यांची उकल व तपास कामात केलेले काम या बद्दल त्यांचा वरिष्ठ पोलिसांनी केलेला गौरव झालेला आहे. त्यांनी केज पोलीस ठाण्याच्या आवारात केलेले वृक्षारोपण आणि सुशोभीकरण यामुळे आणि विविध विभागांचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह पत्रकारांशी असलेले स्नेहाचे सबंध याची आजही केजमधील सामान्य नागरिक यांची आठवण करीत आहेत. केज शहर आणि केज तालुक्यातील नागरिकांच्या ते कायम स्मरणात आहेत.
सध्या सपोनि शंकर वाघमोडे हे संभाजीनगर जिल्ह्यातील वीरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तेथेही त्यांचे सामाजिक कार्यात असलेले योगदान आणि सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी या सेवाभावी वृत्तीची व कर्तव्य कठोर कार्याची दखल माणुसकी समूहाच्याच सु-लक्ष्मीने बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेने घेतली आहे. माणुसकी समुहाच्या ८ व्या वर्धापन दिना निमित्त आणि कु. लक्ष्मी सुमित पंडीत हिच्या १० व्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रातील सामाजिक, युवा, क्रीडा, कला, पत्रकारिता, आरोग्य सेवा, उद्योग, कृषि, सांस्कृतीक, साहित्य व संगीत, प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या गुणी जणांना सेवागौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना उत्कृष्ठ सेवा पुरस्कारासाठी निवड केल्याचे पत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित पंडित आणि सचिव पूजा पंडित यांनी देउन त्यांचे अभिनंदन केले आहे.
लवकरच एका भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
या पुरस्कारा बद्दल शंकर वाघमोडे यांच्यावर त्यांच्या हितचिंतक, मित्रमंडळी आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
विजयराज आरकडे

Post Views: 99
विजयराज आरकडे

Related Posts

July 23, 2026

अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल !

July 15, 2026

केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी

July 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 8 1 3 3
Total Users : 148133
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.