कै.अप्पासाहे देशमुख बहुद्देशीय सेवा भावी संस्था आयोजित रोड सस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मालक,चालक यांची मोफत आरोग्य तपासणी सपन्न
केज-
वाढत असलेल्या अपघात पाहता कै.अप्पासाहेब देशमुख बहुद्देशीय सेवा भावी संस्थाच्या वतीने जिल्ह्यातील वाहन मालक,चालक,वाहक यांची मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आली होते या शिबीरात 93 मालक, चालक,वाहक,यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
रोड सेफ्टीसाठी रस्ता सुरक्षा अभियान या योजना अंतर्गत जिल्ह्यातील छोटे,व मोठे वाहण मालक,चालक,वाहक हे लोकांना पळापळीच्या जीवनात आरोग्यकडे दुर्लक्ष करतात यामुळे विविध आजाराची लागन होऊन वाहन चालत असताना आनेकांना हृदय विकार झटका,बेशुद्ध होणे असे आनेक आजारामुळे अपघात घडतात हे लक्षात घेत कै.अप्पासाहेब देशमुख बहुद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने आज 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मेन रोड वरील संस्थेच्या ऑफीस समोर वाहन,मालक,चालक,यांची मोफत आरोग्य तपासणी केली या शिबीरात 93 लोकांनी सहभागी होऊन आपली तपासणी करुण घेतली कार्यक्रमाला मोलाच मार्गदर्शन करणारे जिल्हा शल्यचिकित्स डा.अशोक थोरात,केज उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक केंद्र,रक्तपीडीचे प्रमुख डा.नागरगोजे,तसेच कर्मचारी राहूल पटेकर,गुफरान हरणमारे यांचे योगदान महत्वाचे ठरले तसेच या कार्यक्रमाला सहकार्य करणारे हनुमंत सौदागर,मुन्ना काझी,जफर हरणमारे,सय्यद साजेद,विठ्ठल सत्वधर, मुज्जफर खतीब,तसेच संस्थेचे अध्यक्ष अरुणराव देशमुख, सचिव सय्यद माजेद यांच्या सह इतर कर्मचारी हजर होते…