नागपूर येथे होणाऱ्या कला प्रदर्शनात कु. ऋची वैरागे हिच्या चित्रांची निवड
गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील जवळबन येथील कु. रुची जयंत वैरागे हिने रेखाटलेल्या पोस्टर कलर मधील पिक्टोरियल डिझाईनच्या दोन चित्रांची नागपूर येथे होणाऱ्या कला प्रदर्शनात निवड झाली आहे.
या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील जवळबन ता. केज येथील सौ. अंजली आणि जयंत वैरागे यांची कन्या कु. रुची वैरागे ही संभाजी नगर (औरंगाबाद) येथील राजा वर्मा चित्रकला महाविद्यालयात चित्रकलेचे शिक्षण घेत आहे.
दरम्यान दि. १० जानेवारी २०२५ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य कला संचनालय विभागाने आयोजित केलेल्या ६४ व्या कला प्रदर्शनात तिने पोस्टर कलरच्या साहाय्याने रेखाटलेल्या पिक्टोरीयल डिझाईन या दोन चित्रांची प्रदर्शनात निवड झाली आहे. यासाठी तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भोईर सर आणि प्राध्यापक वर्ग यांनी मार्गदर्शन केले.
तसेच या पूर्वी देखील तिच्या विविध चित्रण सलग तीन वेळा प्रदर्शनात निवड झालेली आहे.
तिच्या या सन्माना बद्दल तिचे प्राचार्य, प्राध्यापक आणि वर्गमित्र यासह नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.