Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

बीड येथील सर्वपक्षीय मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हावे; केज येथे मार्केट कमिटी येथे नियोजन बैठक संपन्न

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेDecember 26, 2024No Comments2 Mins Read

बीड येथील सर्वपक्षीय मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हावे;

केज येथे मार्केट कमिटी येथे नियोजन बैठक संपन्न

 

केज –
केज तालुक्यातील मस्साजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र आणखीही मुख्य आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी व त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा (दि.२८) डिसेंबर रोजी बीड येथे आयोजित केला आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी केज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुख्य सूत्रधाराला तुरुंगात टाकावे, यातील मुख्य मास्टरमाईंडला तात्काळ अटक करावे या मागणीसाठी शनिवारी (दि.२८) डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातून हजारो नागरिक मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. सरकार आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कृती करून मारेकऱ्यांना ताब्यात घ्यावे. तसेच सदरील खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फासावर लटकावे या व इतर मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन या बैठकीत उपस्थितांनी केले. यावेळी या बैठकीला रमेशराव आडसकर, अंकुशराव इंगळे, ऋषीकेश आडसकर, विजयकुमार भन्साळी, मोहन गुंड, नसीर नेता, मौला सौदागर, दिलीप गुळभिले, राधेश्याम तोष्णीवाल, बिलाल फारोकि, मकसुद फारोकी, राजू जाकेटिया, सुनील गलांडे, संतोष सोनवणे यांचेसह विविध गावचे सरपंच, चेअरमन, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयराज आरकडे

Post Views: 127
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 0
Total Users : 146040
Views Today : 13

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.