Author: विजयराज आरकडे

खाजगी संस्थेतील ट्रेनी शिक्षक अडकले ऑनलाईनच्या भोवऱ्यात; पाच महिन्यापासून शाळेवर शिकवले, ना नोंद ना मानधन लक्षवेधी (डॉ.हनुमंत सौदागर)  विविध खाजगी संस्थेच्या शाळेत काम करत असलेले प्रत्येक शाळेवरील एक ट्रेनी शिक्षक हे ऑनलाईन च्या भोवऱ्यात अडकले आहेत.त्यांना प्रशासनाने तात्काळ न्याय मिळवून द्यावा ही मागणी केली जात आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा शासन निर्णय क्र संकीर्ण 2024/प.क्र 90/व्यशी-3,दि.9 जुलै 2024 नुसार शिकाऊ प्रशिक्षणार्थी योजने अंतर्गत जि.प.शाळा व त्याचबरोबर खाजगी संस्थेतील शाळा याठिकाणी ट्रेनी शिक्षक रूजू करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु यामध्ये फक्त जि.प.शाळावरील ट्रेनी शिक्षकांचे ऑनलाईन करुन त्यांचे मानधन देखील आले.खाजगी शाळेतील ट्रेनी शिक्षकांचा मानधन तर सोडा अद्यापही त्यांंचे…

Read More

*वेळूवन बुद्ध विहारामध्ये एकदिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन शिबीर व सुभेदार रामजी आंबेडकर यांचा स्मृतीदिन कार्यक्रम संपन्न* *भारतीय बौद्ध महासभेचा स्तुत्य उपक्रम* केज- भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या वतीने एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर व सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर यांचा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.केज शहरातील भीमनगर येथील वेळूवन बुद्ध विहारामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांकडून स्थापित या मातृसंस्थेकडून समाजोपयोगी विविध उपक्रम राबविण्यात येतात. धम्म प्रसारासोबतच विज्ञाननिष्ठ समाज घडविण्यासाठी संस्थेकडून प्रयत्न होत असतात. भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष आयु.डॉ.प्रभाकर ठोके यांच्या अध्यक्षतेखाली व आयु.जयपाल मस्के, चंद्रकांत मस्के, महेंद्र मस्के यांच्या नियोजनाने हे शिबीर व अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.सर्वप्रथम…

Read More

सरगम बँजोचे मास्टर जावेद भाई आता अभिनय क्षेत्रात अल्बमच्या पोस्टरचे प्रकाशन !   गौतम बचुटे/केज :- संगीत क्षेत्रात आपल्या सरगम बँजोचे राज्यासह शेजारील तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यात “हर गम मी दुवा..सरगम” म्हणीत प्रसिद्ध असलेला मास्टर जावेद भाई हे आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत असून त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या पहिल्याच म्युझिक अल्बमच्या पोस्टरचे प्रकाशन आपल्या जन्मभूमीत कलाकारांच्या उपस्थितीत गावकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. बीड जिल्ह्यातील साळेगाव ता. केज येथील मास्टर जावेद भाई शेख यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी सुमारे एक दशकापूर्वी सरगम ढोली बाजा सुरू केला. त्या नंतर त्यांनी अत्याधुनिक सुविधेसह आणि हर गम की दुवा सरगम…

Read More

मुख्याध्यापक मदनराव जोगदंड यांचा सेवापूर्ती गौरव संपन्न;  केज- तालुक्यातील सादोळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मदन हरिभाऊ जोगदंड हे नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त सेवापूर्ती गौरव सोहळा व निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर प्रमुख पाहुणे ह भ प महादेव आडसूळ महाराज ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल केंद्रे, दत्तात्रय चाटे , सुधाकर ढाकणे, महादेव साबळे ,पुणे येथील उद्योजक सहदेव थोरात, महादेव वैरागे, श्री अंकुशे, केंद्रप्रमुख साळेगाव ,श्री संजय चौरे केंद्रप्रमुख केज, श्री अर्जुन बोराडे केंद्रप्रमुख युसूफ वडगांव, श्री सूर्यकांत काळे केंद्रीय मुख्याध्यापक साळेगाव , प्राचार्य अंकुश भोसले वडगांव, श्री तुकाराम देशमुख…

Read More

चंदन सावरगाव जवळ दोन कारचा भीषण अपघातात; दोघे जागीच ठार तर एक गंभीर जखमी गौतम बचुटे/केज :- दि. ३१ जानेवारी रोजी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील चंदनसावरगाव जवळ झालेल्या दोन कारच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या बाबतची माहिती अशी की, ३१ मार्च रोजी रात्री १०:४५ वा. च्या सुमारास महामार्ग क्र. ५४८-डी केज-अंबेजोगाई रोडवर चंदनसावरगाव जवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपा जवळ (एम एच-२३/ई ६८५२) आणि (एम एच-१२/एम डब्ल्यू-३५६३) या दोन स्विफ्ट कारची समोरा समोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, आवाजाने वस्ती आणि गावातील नागरिक अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झाले.…

Read More

स्वामी विवेकानंद विद्या मंदिर (प्राथमिक विभाग) केजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थी कलाकार घडतात—डॉ हनुमंत सौदागर केज – केज शहरातील नामांकित शाळा स्वामी विवेकानंद विद्या मंदिर (प्रा) चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात पार पडले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून केज गटसधान केंद्राचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे, प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर म्हणाले मराठवाडा ही कलाकारांची भूमी आहे स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो यामधून चांगले कलाकार घडतात असे मत व्यक्त केले श्री चाटे म्हणाले बालकलाकारांना पालक चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य करतात असे मत व्यक्त केले. प्रमुख उपस्थिती जीवन विकास शिक्षण मंडळ…

Read More

*सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.लहाने यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचा केजच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा* – प्रा.कलढोणे   केज ( प्रतिनिधी ) केजच्या शैक्षणिक वातावरणात गेल्या दहा वर्षांपासून ज्ञानज्योती कोचिंग क्लासेसने आमुलाग्र बदल केले असुन सर्व सामान्य विद्यार्थीही वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वी होत आहेत.विद्यार्थांना अभ्यासासाठी प्रेरणा मिळावी म्हणुन लातुर येथील प्रसिद्ध सर्जन डॉ.विठ्ठल लहाने,प्रा.उदय देशपांडे यांचे प्रेरणादायी व्याख्यान दि.9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता ज्ञानज्योती कोचिंग क्लासेस, डॉ.जाजु काम्पलेक्स , कानडी रोज केज येथे होणार असुन केज तालुक्यातील व शहरातील विद्यार्थी व पालकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रा.ज्ञानेश कलढोणे यांनी दिली आहे.

Read More

केज तालुका सकल मराठा समाजाचा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्या रास्तारोको   केज : मनोज जरांगे पाटील त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची व त्यांच्यासोबत उपोषण करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र शासनाने त्यांच्या उपोषणाची अद्याप दखल घेतलेली नाही. त्यांचे आंदोलन हे सकळ मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याने समाजाने त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत त्यांच्या जीवाला कधीही धोका होऊ शकतो. शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन तात्काळ चर्चा करावी यासाठी केज तालुका सकल मराठा-बहुजन समाजाच्या वतीने गुरुवार दि 30 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता केज च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. लोकशाही…

Read More

केज विकास संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश मांजरा नदी पुलाच्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू: दोन महिन्यात काम पूर्ण होणार केज : गेली पाच वर्षे केज विकास संघर्ष समिती ज्या मांजरा पुलाच्या एक किमी रस्त्याच्या मजबुती व डांबरीकरणासाठी पाठपुरावा करत होती. हे काम आंदोलन करताच युद्धपातळीवर सुरू झाले असून येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलणार खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी मध्यस्थीकडून समितीला सहकार्य केले. खामगांव-पंढरपूर या महामार्गावर मांजरा नदी पूल व पुढे याच रस्त्यावर येरमाळा घाटाखाली असाच खराब रस्त्याचा पॅच मजबुती व डांबरीकरण करावे या मागणीसाठी केज विकास संघर्ष…

Read More

झोपडपट्टी वासियांच्या हक्कासाठी केज येथे झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीची स्थापना केज (प्रतिनिधी) – सरकारी जमिनीवरील घराखालील जागेचे अतिक्रमण कायम करून त्यांना नागरी सुविधा तसेच विविध सरकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी केज येथे बहुजन चळवळीतील नेते बाबुराव गालफाडे यांच्या निवासस्थानी आज दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी व्यापक बैठक घेण्यात आली. झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष कडूदास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीसाठी केज शहरातील बाबुराव गालफाडे,  विनायक लोंढे,  भिमराव हजारे, महादेव लांडगे,  सोमनाथ राऊत, शरद कांबळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते केज नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अनेक झोपडपट्ट्या मधून सरकारी जमिनीवर अनेक गोरगरीब कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण करून राहत…

Read More